Prasad Oak Thanks Post For CM Eknath Shinde Instagram/ @oakprasad
मनोरंजन बातम्या

Prasad Oak: ‘वास्तूशांतीच्या दिवशी आमच्या घरी आलात अन्....’; प्रसाद ओकची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भातील ‘ती’ पोस्ट चर्चेत

Prasad Oak News: अभिनेता प्रसाद ओकच्या घराच्या नव्या घराची वास्तूशांती होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनीही पूजेला उपस्थिती लावली होती. या खास क्षणाचे फोटो शेअर करत प्रसादने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

Chetan Bodke

Prasad Oak Thanks Post For CM Eknath Shinde

एक उत्तम अभिनेता आणि उत्तम दिग्दर्शक म्हणून प्रसाद ओकची सिनेसृष्टीमध्ये ओळख आहे. 'धर्मवीर' चित्रपटामध्ये साकारलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या भुमिकेने प्रसाद ओकला चांगलीच प्रसिद्धी प्राप्त झाली.

चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला 'धर्मवीर २' येतोय. प्रसादने नव्या वर्षाच्या सुरुवातीला नवीन घर खरेदी केल्याची बातमी दिली. त्याच्या नव्या घराच्या वास्तूशांतीला प्रसादने मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केलं होतं.

प्रसादच्या शब्दाचा मान ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याच्या त्याच्या नव्या घरी उपस्थिती लावली होती. या खास क्षणाचे फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्र्यांचं आभार मानताना प्रसाद ओक पोस्टमध्ये म्हणाला, “मुख्यमंत्री साहेब…! माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराच्या विनंतीला मान देऊन... तुम्ही दिलेला शब्द पाळलात आणि वास्तू शांतीच्या दिवशी आमच्या घरी आलात. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आलात. कोणताही राजकारणी अविर्भाव न ठेवता अगदी कुटुंबातलेच असल्याप्रमाणे आमच्या बरोबर बसलात, जेवलात... नीट निरखून आख्खं घर पाहिलंत... हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण ज्या पद्धतीनं ‘माणूस’ जोडता आहात ते पाहता ‘गुरुने दिला ज्ञानरुपी वसा... आम्ही चालवू हा पुढे वारसा’ हे शब्द तंतोतंत खरे करताय असंच वाटलं... साहेब... मनःपुर्वक आभार... ओक कुटुंबीय.” (Social Media)

प्रसादच्या इन्स्टाग्राम पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. प्रसादने नवीन घर घेतल्यामुळे त्याला सोशल मीडियावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

प्रसादच्या कामाबद्दल बोलायचे तर, प्रसादचा ‘वडापाव’, ‘जिलबी’, ‘धर्मवीर २’, ‘महापरिनिर्वाण’, ‘पठ्ठे बाबुराव’, ‘रीलस्टार’ या चित्रपटांमुळे सध्या तो चर्चेत आहे. यातील अनेक चित्रपटांची शुटिंग सध्या सुरु काहींची अजून शुटिंग बाकी आहे. त्याच्या ह्या आगामी चित्रपटाची नेटकऱ्यांना कमालीची उत्सुकता आहे. प्रसादचे हे सर्व चित्रपट २०२४ मध्येच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

Police Roles: राणी मुखर्जीपासून अजय देवगणपर्यंत, 'या' कलाकारांनी पडद्यावर साकारली पोलिसांची दमदार भूमिका

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग करणारे अखेर अटकेत

SCROLL FOR NEXT