Devendra Fadnavis On Chhaava Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chhava Movie: 'मला हा चित्रपट पाहायचा...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इच्छा व्यक्त करत 'छावा' टॅक्स फ्रीबाबत केली मोठी घोषणा

Devendra Fadnavis On Chhaava Movie: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील छावा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त करत या चित्रपटाच्या टॅक्स बाबत मोठी घोषणा केली आहे.

Shruti Vilas Kadam

Devendra Fadnavis On Chhaava Movie: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विकी कौशलच्या छावा चित्रपटाची क्रेझ वाढत आहे. प्रेक्षां मोठ्या गर्दीने हा चित्रपट पाहायला जात आहेत. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त करत या चित्रपटाच्या टॅक्स बाबत मोठी घोषणा केली आहे.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मला छावा चित्रपट पाहायचा आहे कारण ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांनी मला सांगितलं इतिहासाशी कोणतीही प्रतारणा न करता हा चित्रपट बनवला आहे. त्याबद्दल मी सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेता विकी कौशल याच मनापासून अभिनंदन करतो.

हा चित्रपट टॅक्स फ्री करा ही मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. पण मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो इतर राज्य जेव्हा सिनेमा टॅक्स फ्री करतात तेव्हा त्यावरचा करमणूक कर ते माफ करत असतात. मात्र २०१७ सालीच महाराष्ट्राने करमणूक कर कायमचा रद्द केलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारची टॅक्स फ्री माफ करण्याकरता आपल्याकडे तो लागू नाही. पण या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता महाराष्ट्र शासन म्हणून जे करता येईल ते नक्की करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

चित्रपटाच्या कलेक्शन बाबत बोलायचे झाले तर आता पर्यंत 'छावा' चित्रपटाने चार दिवसांत सिनेमाचे बजेट वसूल करत वर्ल्डवाइड 195.60 कोटींचा व्यवसाय केला आहे. विकी कौशल, रश्मीने मंदाना आणि अक्षय खन्ना यांचा छावा हा चित्रपट प्रेक्षकांना अत्याधिक आवडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UIDAI Internship: आधार बनवणाऱ्या कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी, UIDAI मध्ये इंटर्नशिप; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Mumbai Pune Expressway: गुड न्यूज! मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार; कधीपासून येणार सेवेत?

Maharashtra News Live Update: रक्ताचं पाणी होईपर्यंत वहिनींच्या पाठीशी उभे राहू : हसन मुश्रीफ

भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फोडला, आवाजाने परिसर हादरला; बचाव पथक मदतीला धावलं

Monday Important Remedies: घरात पैशांची तंगी सुरू आहे? सोमवारी हे 5 उपाय करा, महादेवाच्या कृपेने होईल भरभराट

SCROLL FOR NEXT