Madhuri Dixit-Shriram Nene Post On 24th Wedding Anniversary Instagram @madhuridixitnene
मनोरंजन बातम्या

Madhuri Dixit - Shriram Nene: 'आपला प्रवास नुकताच सुरू झालाय...' लग्नाच्या २४ व्या वाढदिवशी श्रीराम नेनेंनी पत्नी माधुरी दीक्षितसाठी केली खास पोस्ट

Madhuri Dixit Post: माधुरी दीक्षितने तिच्या पोस्टमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Pooja Dange

Shriram Nene Pens Special Note For Madhuri Dixit:

अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही तिच्या अदांनी अनेकांच्या घायाळ करते. माधुरी दीक्षितने 'तेजाब', 'देवदास'सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटातील माधुरीच्या अभिनयाचे आणि नृत्याचे आजही कौतुक केले जाते.

माधुरी दीक्षित तिच्या कामामुळे चर्चेत असते. पण आज माधुरी दीक्षितने तिच्या पोस्टमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांच्या लग्नाला २४ वर्षे झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त माधुरी दीक्षितने श्रीराम नेने यांच्यासाठी एक पोस्ट लिहिले आहे.

माधुरी दीक्षितने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माधुरीने पती श्रीराम नेने यांच्यासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ एकत्र करून एका व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माधुरीने श्रीराम नेने यांच्यासोबतच २४ वर्षांचा प्रवास शेअर केला आहे.

माधुरीने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, 'आपण एकत्रित घालवलेले आणखी एक वर्ष' माधुरी दीक्षितच्या या पोस्टवर शिल्पा शेट्टी, रेणुका शहाणे, विकास खन्ना यांच्यासह अनेक चाहत्यांनाही माधुरीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Celebrity)

श्रीराम नेने यांनी देखील एक्सवर पोस्ट करत माधुरी दीक्षितला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'माझ्या आयुष्यातील त्या प्रेमासाठी, लग्नच्या २४ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. असं वाटतंय की आपण आपला प्रवास कालच सुरू केला आहे. आता आपल्या या घरट्यात दोन मुले आहेत. पुढील अशी अनेक वर्षे आपण एकत्र बऱ्याच गोष्टी करणार आहोत.' अशी सुंदर नोट श्रीराम नेने यांनी त्यांची सुंदर पत्नी माधुरीसाठी लिहिली आहे. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: लाडक्या बहिणींना योग्यवेळी 2100 रुपये देणार-एकनाथ शिंदे

शिंदेंच्या भावाचं नाव ड्रग्ज प्रकरणात? बड्या नेत्याचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT