Bhool Bhulaiyaa 3 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यनचा 2-2 मंजुलिकासोबत सामना, माधुरी दीक्षित-विद्या बालनला कसं रोखणार रूह बाबा?

Shreya Maskar

2007 साली अक्षय कुमारचा 'भूल भुलैया' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर 15 वर्षांनंतर 2022 मध्ये 'भूल भुलैया 2' मधून कार्तिकने एन्ट्री मारली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला आहे. 'भूल भुलैया 2'साठी कार्तिकला ६८व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. आता 'भूल भुलैया 3'ची (Bhool Bhulaiyaa 3) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

नुकताच 'भूल भुलैया 3'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट मनोरंजनाच पॉवरहाऊस आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा आहे. ज्यातून कार्तिक आर्यन पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे.

'भूल भुलैया 3'चा ट्रेलर जयपूरच्या राज मंदिरात लाँच करण्यात आला आहे. 'रूह बाबा' पुन्हा एकदा भूत काढण्यासाठी सज्ज झाला आहे. तो परत त्या झपाटलेल्या हवेलीत जाणार आहे आणि नवा धुमाकूळ घालणार आहे. हवेलीतील रहस्य उलघडणार आहे. चित्रपटात कार्तिक आणि तृप्तीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे विद्या बालन (Vidya Balan) पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'भूल भुलैया 3'चा ट्रेलर एक खास गोष्ट पाहायला मिळाली आहे. ज्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ती म्हणजे धक-धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) या चित्रपटात दिसत आहे. माधुरी दीक्षितही या चित्रपटात दुसऱ्या मंजुलिकाची भूमिका साकारणार आहे. म्हणजे चित्रपटात 'रूह बाबा' दोन मंजुलिकांची सामना करावा लागणार आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि विद्या बालन दोघही कमाल डान्स करताना पाहायला मिळत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Corporation : बिना परवाना बॅनर लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल; धुळे महापालिकेची कारवाई

Navratri Kanya Pujan: कन्या पूजन करताना 'या' विशेष गोष्टींची काळजी घ्यावी...

Maharashtra News Live Updates: अबु सालेमच्या भेटीसाठी आलेले दोघे एटीएसच्या ताब्यात

Wildlife : सिंहाची पिल्लं नेमकी कधी वयात येतात? जाणून घ्या जंगलाच्या राजाची रंजक माहिती

Katrina Kaif: कतरिनाला झाला मधुमेहाचा आजार? दंडावरील पॅचमुळे चाहत्यांमध्ये चर्चा, पाहा Video

SCROLL FOR NEXT