Lust Stories Actors Want To Be Romance Saam Tv
मनोरंजन बातम्या

Neena Gupta- Angad Bedi Romance: ‘भविष्यात मला नीना गुप्तांसोबत रोमान्स...’ म्हणत अंगद बेदीने व्यक्त केली मनातली इच्छा

Angad Bedi On Neena Gupta: नुकतंच एका दिलेल्या मुलाखत अंगद बेदीने नीना गुप्ता यांच्या भूमिकेविषयी सांगितले आहे.

Chetan Bodke

Lust Stories Actors Want To Be Romance: बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता नेहमीच आपल्या परखड मतामुळे आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असतात. सध्या नीना गुप्ता ‘लस्ट स्टोरी २’ या चित्रपटामुळे तुफान चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने ‘एका चित्रपटात इंटिमेट सीन दिल्यानंतर डेटॉलने चुळ भरली होती.’ या विधानामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली होती.

आता पुन्हा एकदा अभिनेत्री चर्चेत आली आहे. ‘लस्ट स्टोरीज २’मध्ये नीना गुप्ता प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासोबत मृणाल ठाकूरसह अंगद बेदी देखील प्रमुख भूमिका साकारत आहे. चित्रपटात यांच्या सोबत अनेक कलाकार देखील प्रमुख भूमिकेत आहे.

चित्रपटात मृणालच्या आजीची भूमिका भूमिका नीना गुप्ता यांनी साकारली असून नीना यांच्या भूमिकेचे कौतुक सर्वत्र होत आहे. चित्रपटात मृणाल आणि अंगदचे लग्न जुळवायला आजीचा (नीना गुप्ता) खूप मोठा मोलाचा वाटा आहे. नुकतंच अंगदने एक मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत अंगदने नीना गुप्ता यांच्या भूमिकेविषयी त्याने सांगितले आहे.

अंगद बेदी मुलाखतीत म्हणतो, “नीना गुप्ता यांनी चित्रपटात आपले पात्र अगदी प्रभावित रित्या साकारले आहे. त्यांच्या सारखे काम कोणालाच जमणे अशक्य आहे. त्यांनी चित्रपटात एक गंभीर भूमिका साकारली, त्या भूमिकेसाठी त्यांनी जे काम केले, ते खूपच सुंदर आहे. त्यांचा चित्रपटातील एक डायलॉग फारच व्हायरल झाला. त्यांनी ‘तुम्ही एकमेकांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत का?’ हा डायलॉग त्या अगद सहज रित्या बोलताना आपल्याला दिसत आहे. त्यांचे अभिनयातील कौशल्य पाहून त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.”

मुलाखतीत अंगद बेदी पुढे म्हणाला, “नीना गुप्ता यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचे तर, त्या समोरच्या व्यक्तीला नेहमीच प्रत्येक गोष्ट फारच प्रेमाने समजावून सांगतात. कधीच समोरच्या व्यक्तीला त्यांचा राग येणं अशक्य आहे. त्यांच्याऐवजी जर दुसरा अभिनेता किंवा अभिनेत्री असती तर, आम्ही एवढा दिलखुलास त्यांच्यासोबत संवाद साधला नसता. त्यांच्यासोबत काम करताना मला खूप चांगला अनुभव आला आहे. भविष्यात मला नीना गुप्तांसोबत रूपेरी पडद्यावर रोमान्स करण्यासाठी हरकरत नसेल, असा कोणताही प्रोजेक्ट असेल तर मी काम करण्यासाठी तयार आहे.”

‘लस्ट स्टोरीज २’ हा चित्रपट २९ जून २०२३ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून चित्रपटात चार वेगवेगळ्या धाटणीच्या कथा मांडण्यात आल्या आहेत. ‘लस्ट स्टोरीज’च्या पहिल्या भागात अर्जुन (अंगद बेदी) आणि वेदाच्या (मृणाल ठाकूर ) आयुष्यावर कथा आधारित आहे. या चित्रपटाच्या कथेचं शीर्षक ‘मेड फॉर इच अदर’ असं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT