Asha Bhosle Google
मनोरंजन बातम्या

Aasha Bhosale: आशा भोसलेंनी बॉलिवूडमध्ये डेब्यू कधी केला? त्यांचं शेवटचं गाणं कोणतं?

Asha Bhosle Passes Away: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले. ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांनी ८ दशकांपेक्षा अधिक काळ गाणी गायली. त्यांनी पहिलं गाणं आणि शेवटचं गाणं कधी गायलं? वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • आशा भोसले यांचे ९२ व्या वर्षी निधन

  • १९४३ साली पहिलं गाणं गायलं

  • ८ दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी १२ हजारांहून अधिक गाणी गायली

  • ‘सैया बिना’ हे त्याचे शेवटचे गाणे ठरले

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झालं. ९२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडला मोठा धक्का बसला. सुरांची मलिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले याांनी विविध भाषेमध्ये १२ हजारांपेक्षा जास्त गाणी गायली होती.

बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टी आणि संगीत क्षेत्रात आशा भोसले हे नाव अत्यंत आदराने घेतले जात होते. त्यांनी गेली ८ दशकं संगीत क्षेत्राला समर्मित केली होती. ८ दहशकाहून अधिक काळ त्या चित्रपटसृष्टीत सक्रीय होत्या. त्यांनी ११ ते १२ हजारांपेक्षा जास्त गाणी गात चाहत्यांच्या मनावर राज्य केले. त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले होते. आशा भोसले यांनी अवघ्या १० व्या वर्षी आपले पहिले गाणं गायले होते. हे गाणं हिंदी नाही तर मराठी होते. त्यांनी १९४३ साली 'माझा बाळ' या मराठी चित्रपटासाठी 'चला चला नव बाळ'हे पहिले गाणं गायले होतं.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आणि ती सुपरहिट ठरली. त्यांनी १९४८ साली बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यांचे पहिले हिंदी गाणे १९४८ सालच्या 'चुनरिया' या चित्रपटातील होते. त्या गाण्याचे नाव 'सावन आया' होते. त्यांचे पहिले हिंदी एकल गाणे १९४९ सालच्या 'रात की रानी' या चित्रपटातील होते. १९५३ सालच्या 'परिणीता' चित्रपटातील गाण्यांनंतर त्यांना खरी ओळख मिळाली आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

आशा भोसले गेल्या ८ दशकांपासून संगीत क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आशा भोसले यांना त्यांच्या कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट गायिकेसाठी सात फिल्मफेअर पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कारासह अनेक सन्मान मिळाले आहेत. महत्वाचे म्हणजे, आशा भोसले वयाच्या ९२ व्या वर्षीही सक्रिय होत्या आणि गाणी रेकॉर्ड करत होत्या. त्यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी आपले शेवटचे गाणे रेकॉर्ड केलं होतं. त्यात त्यांची नात जनाई भोसले हिने देखील काम केले होते. त्या गाण्याचे नाव 'सैया बिना' होतं. त्याची निर्मिती नितीन शंकर यांनी केली होती. हे गाणे यूट्यूबवर उपलब्ध असून त्याला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT