Gautami Patil Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil: श्वास रोखून धरा! 'सबसे कातिल गौतमी पाटील'ला लागली लॉटरी; चित्रपटात करणार दणक्यात एंट्री

दिलखेचक अदा आणि भलाभल्यांना थिरकायला लावणाऱ्या नृत्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी गौतमी पाटील आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gautami Patil: महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात सध्या गौतमी पाटीलच्याच नावाची तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. आपल्या दिलखेचक अदा आणि थिरकायला लावणाऱ्या लावणीने गौतमीने तरुणांना अक्षरशः वेड लावले आहे. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी गौतमी पाटील आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. याबद्दल स्वतः गौतमी पाटीलने खुलासा केला आहे.

गौतमी पाटील हे नाव सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच चर्चेत असते. आपल्या कसदार नृत्याने गौतमी पाटील नेहमीच प्रेक्षकांना वेड लावत असते. त्यामुळेच कुठेही कार्यक्रम असला तरी गौतमी पाटीलचा डान्स पाहायला तरुणांची तुफान गर्दी पाहायला मिळते. गौतमी पाटीलच्या डान्सचे जबरदस्त चाहते असणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली असून ती लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहे. याबद्दलची माहिती स्वतः गौतमीने सोशल मीडियावरुन दिली आहे.

घुंगरू अस या चित्रपटाचे नाव असून गौतमी पाटील त्यामध्ये अभिनय करताना दिसणार आहे. सोशल मीडियावरुन गौतमी पाटीलने याबद्दलची माहिती आपल्या चाहत्यांना दिली असून "घुंगरू या मराठी चित्रपटात मी झळकणार असून त्यामध्ये माझी कोणती भूमिका असेल याबद्दल मी आत्ताच सांगणार नाही, तुम्ही स्वतः सिनेमागृहात या आणि हा चित्रपट पाहा," असे आवाहन तिने चाहत्यांना केले आहे. (Marathi Movie)

दरम्यान, "या चित्रपटाचे शुंटिंग सध्या सुरू असून ते पुर्ण झाल्यानंतर प्रदर्शनाची तारीख निश्चित केली जाईल," असेही गौतमीने सांगितले आहे. चित्रपटातून लोककलावंतांची व्यथा पडद्यावर मांडणार असल्याचेही गौतमीने सांगितले आहे. आता गौतमीच्या चाहत्यांना या चित्रपटाची जोरदार उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाणे बेलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Pune : मुसळधार पावसात भयंकर घटना, पुण्यात खड्ड्यात बुडून २ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, नेमकं झालं काय?

8th Pay Commission: सोन्याच्या किंमतीवर ठरणार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार? DA, HRA, पेन्शन आणि एरिअरबाबत मोठा खुलासा

EPFO Update : EPFO चा मोठा निर्णय! तुमच्या संमतीशिवाय PF कापला जाणार नाही, १८०० रुपये अनिवार्य राहणार

पुण्यातील स्टील व्यापाऱ्याला ५ कोटींची खंडणी... अन् बिश्नोई गँगचा गेम उलटला; राजस्थानमधून मुख्य आरोपी गजाआड!

SCROLL FOR NEXT