Gautami Patil News: लावणी डान्सर गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. गौतमीला कमी कालावधित अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. गौतमीने तिच्या नृत्यामुळे नवी ओळख निर्माण केली आहे. तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. तरुणांच्या याच लाडक्या गौतमीने पंढरपूरमध्ये विठुरायांचं दर्शन घेतलं. तसेच यावेळी गौतमीने देवाला साकडं देखील घातलं. (Latest Marathi News)
गौतमी काही दिवसांपूर्वी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली होती. गौतमी तिच्या आडनावावरून चर्चेत आली होती. मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी गौतमीने पाटील आडनाव लावू नये, असा इशारा दिला होता.
मात्र, तिने पाटील आडनाव हटवणार नाही असं प्रत्युत्तर दिलं होतं. तिचे वडील रवींद्र नेरपगारे पाटील यांनी देखील प्रसारमाध्यमांसमोर येत तिच्या आडनावावर भाष्य केलं होतं. गौतमीचं आडनाव पाटीलच आहे. त्यामुळे ती हेच आडनाव लावणार, असं तिच्या वडिलांनी म्हटलं होतं.
गौतमीच्या आडनावावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू असताना ती मात्र, सध्या पंढरपूरच्या दौऱ्यावर आहे. गौतमीने पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले आहे. गौतमीने देवाचं दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. त्यावेळी गौतमीने वारकऱ्यांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. गौतमीने विठुरायांचं दर्शन घेतल्यानंतर यंदाच्या आषाढी वारीत वारकऱ्यांची सेवा करण्याचा मनोदय व्यक्त केला.
गौतमी म्हणाली, 'आषाढी पायी सोहळ्यात थकलेल्या भागलेल्या वारकऱ्यांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम करण्याचा विचार आहे. विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. विठुरायांचा सदैव आपल्या डोक्यावर आशीर्वादाचा हात राहावा. सर्वांना सुखी ठेवावे, असं साकडं विठुरायांच्या चरणी घातल्याचे गौतमीने सांगितले.
दरम्यान, गौतमीच्या बाबांचा हा व्हिडिओ समोर आल्यावर तिच्या (Gautami Patil) खासगी आयुष्याविषयी चर्चा रंगत आहे. ती आपल्या बाबांना केव्हा भेटणार,असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. या प्रश्नाचं तिने स्वत: उत्तर दिलं आहे. 'तो माझा कौटुंबिक प्रश्न आहे. यावर मी आता काहीच बोलू शकत नाही', असे गौतमीने म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.