Payad Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Palyad Trailer: सगळ्यांच्या 'पल्याड' जाणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलर पाहुन तुम्ही म्हणाल...

गोव्यात इफ्फी पुरस्कारासाठी चित्रपटाची निवड होताच या ऐनमोक्यावर 'पल्याड' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बरेच मराठी चित्रपट प्रदर्शनाआधीच पुरस्कार पटकवत आहे. (Marathi Entertainment News) राष्ट्रीय पुरस्कारांसह आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मानकरी ठरल्यावर चित्रपट प्रदर्शित केले जात आहे. अनेक पुरस्कारांवर आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरल्यानंतर चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाने आपल्या नावावर चांगलेच इतिहास रचले आहेत. चित्रपटाने अनेक विविध पुरस्कारांमध्ये यशस्वी घौडदौड सुरु ठेवली. जागतिक पातळीवरील सर्वात प्रसिद्ध असलेल्या फोर्ब्स मासिकेनेही या चित्रपटाची नोंद केली आहे. हा चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. (Marathi Movie)

यंदाच्या गोव्यात पार पडणाऱ्या इफ्फीत अर्थात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियासाठी निवड करण्यात आल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली. चित्रपटाची यशस्वी घौडदौड पाहता चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा विषय पाहता सोशल मीडियासह सर्वच स्तरावर चित्रपटाचा जयजकार होत आहे. प्रेक्षकांच्या मनात कुतूहल जागवाणारा चित्रपट असल्याची चर्चा होत आहे.

गोव्यात इफ्फीसाठी निवड होताच या ऐनमोक्यावर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरची सुरुवात 'मुक्ती देईन म्हणजे काय रं आबा?' या लहान मुलाच्या संवादानेच सुरु होते. पाप- पुण्याच्या फेऱ्यातून मुक्त करणे म्हणजे मुक्ती मिळणे असा अर्थ मुलाला सांगितला जातो. शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुलाची कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे. शिकण्याची इच्छा असलेला मुलगा आणि त्याला शिकून मोठं झाल्याचं स्वप्न पाहणारी त्याची आई याभोवती चित्रपटाची कथा फिरते. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

स्मशानजोगी समाजातील लहान मुलाला अशिक्षीत राहून लोकांना मुक्ती देण्याऐवजी शाळेत जाऊन शिकण्याची इच्छा असते, पण त्याने शाळेकडे फिरकलेलंही समाजाला मान्य नसतं. अशा परिस्थितीत शिकण्याची इच्छा असलेला मुलगा आणि त्याला शिकून मोठं झाल्याचं स्वप्न पाहणारी त्याची आई काय करते ते चित्रपटात पहायला मिळणार असल्याचं ट्रेलर पाहिल्यावर जाणवतं. आशयघन कथानक, समाजाभिमुख विषय, सुरेख वातावरण निर्मिती, वास्तवदर्शी लोकेशन्स, समाजातील कटू सत्य मांडणारं दिग्दर्शन आणि कलाकारांचा सहजसुंदर अभिनय यांचा सुरेख संगम 'पल्याड'मध्ये पाहायला मिळणार असल्याची झलकच ट्रेलर दाखवतो.

अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये 'पल्याड' चित्रपटाने हॅट्रिक मारली आहे. चंद्रपुर जिल्ह्यात अवघ्या २५ दिवसांमध्ये चित्रपटाचे शुटिंग आटोपले. शैलेश दुपारे दिग्दर्शित चित्रपटात शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, बाल कलाकार रुचित निनावे, देवेंद्र दोडके आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहेत. येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. (Marathi Actors) (Marathi Actress)

Edit By: Chetan Bodke

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli : कसोटीतून निवृत्ती का घेतली? विराट कोहलीनं विचित्र कारण सांगितलं, म्हणाला, जेव्हा ४ दिवसांत दाढी...

Maharashtra Live News Update : अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

Pune News : 'स्पा सेंटरमध्ये फक्त स्पा चालू ठेवा, अन्यथा...' पुणे पोलिसांचा मालकांना सज्जड दम

Vande Bharat : नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला; कुठे कुठे थांबणार? तिकिट किती? जाणून घ्या सर्व माहिती

Dhule News : माजी सैनिक चंदू चव्हाणांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT