Lagnanantar Hoilach Prem SAAM TV
मनोरंजन बातम्या

Lagnanantar Hoilach Prem : जीवा करतोय नंदिनीचं मन जिंकण्याचा प्रयत्न, काव्या-पार्थचं नातं कोणतं वळण घेणार? पाहा VIDEO

Lagnanantar Hoilach Prem Update : 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत सध्या रंजक वळण पाहायला मिळत आहे. जीवा आणि काव्या नंदिनी-पार्थचे मन जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यांचे नाते कोणते नवे वळण घेणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'लग्नानंतर होईलच प्रेम' (Lagnanantar Hoilach Prem) ही मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेत सध्या रंजक वळण पाहायला मिळत आहे. नंदिनी आणि पार्थने काव्या आणि जीवाला घटस्फोटाच्या नोटीस दिल्या आहेत. मात्र आधी नात तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या काव्या आणि जीवाला त्यांच्या जोडीदारांसोबत आता हे नाते टिकवायचे आहे. त्यामुळे काव्या आणि जीवा आपल्या जोडीदाराचे मनं जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

जीवा -नंदिनीचं नातं

जीवा नंदिनीचा राग काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तो आपल्या वागण्यातून नंदिनीचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय. त्याने नंदिनीसाठी चक्क ऑमलेट बनवले आहे. तो तिला खाण्यासाठी आग्रह करताना व्हिडीओ पाहायला मिळते. मात्र नंदिनी खाण्यास नकार देते. तर दुसरीकडे जीवा नंदिनीसाठी रिक्षावाला देखील होतो.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नंदिनी बाहेर गेली असताना रिक्षा शोधत असते तेव्हा जीवा रिक्षा घेऊन येतो. जीवाला रिक्षावाल्याच्या कपड्यात पाहून नंदिनीला धक्का बसतो. जीवा नंदिनीचा राग काढू शकेल का? आणि तिला मनवण्यासाठी जीवा अजून काय करणार? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

काव्या-पार्थचं नातं

एकीकडे जीवा नंदिनीचा राग काढण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे काव्या पार्थला समजावताना आणि त्याला मनवताना दिसत आहे. काव्या आणि पार्थच्या नात्यात देखील दुरावा आल्याचे दिसत आहे. पार्थने काव्याला घटस्फोटाची नोटीस दिली आहे. आता पार्थचा रूसवा काढण्यासाठी काव्या देखील रिक्षा घेऊन पार्थच्या ऑफिस बाहेर येते आणि त्याला सरप्राइज देते. पार्थच्या गाडीचा टायर पंक्चर होतो.

'लग्नानंतर होईलच प्रेम' आता या दोन्ही जोड्यांच्या आयुष्यात नक्की काय होणार? काव्या पार्थचा राग कसा घालवणार? जीवा नंदिनीचं मन कसे जिंकणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लग्नानंतर खरंच प्रेम होत का? हे जाणून घेण्यासाठी आवर्जून 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिका पाहा. ही मालिका स्टार प्रवाहवर संध्याकाळी 7.00 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

SCROLL FOR NEXT