Kushal Badrike - Bhau Kadam Comedy Video Instagram @badrikekushal
मनोरंजन बातम्या

Kushal Badrike Post: भर ट्रॅफिकमध्ये रंगलं 'चला हवा येऊ द्या'चं लाईट व्हर्जन; कुशलने भाऊला खुळ्यात काढलं

Kushal Badrike - Bhau Kadam: कुशल - भाऊचं हे बॉडिंग ऑफ स्क्रीन देखील तसंच भारी आहे.

Pooja Dange

Kushal Badrike Funny Video:

कुशल बद्रिके आणि भाऊ कदम 'चला हवा येऊ द्या'मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. 'चला हवा येऊ द्या'मधील त्यांच बॉडिंग खुप कमाल आहे. कुशल - भाऊचं हे बॉडिंग ऑफ स्क्रीन देखील तसंच भारी आहे.

कुशल आणि भाऊ अनेकदा एकत्र प्रवास करतात. त्यांची मैत्री देखील खूप जुनी आहे. त्यामुळे त्यांचे अनके किस्से आणि किडे ते दोघे शेअर करतात. असाच एक किस्सा कुशलने शेअर केला आहे.

कुशलने आणि भाऊ शूट संपल्यानंतर एकत्र घरी जातात. त्यामुळे गाडीमध्ये अनेकदा त्यांचे मैफल रंगते. अशाच एका मैफिलचा किस कुशलने सांगितलं आहे. कुशल म्हणतो की, “भाऊ कदम” आणि “मी” बऱ्याचदा आमच्या दोघांचीच मैफल रंगते. तशी आमच्या मैत्रीला बरीच वर्ष झाली पण आजही आमचा प्रवास एकत्रच होतो.

रात्री 3/4 ला packup करुन निघाल्यानंतर प्रवासात भाऊ आणि माझी मैफिल सुरू होते सोबतीला कधी गुलाम अली साहेब, मेहदी हसन साहेब, कधी पंकज उदास, कधी जगजीत सिंगजी, कधी हरिहरन, कधी लता ताई, कधी साब्री ब्रदर्स अशी असंख्य दिग्गज आमच्यासोबत गाडीत असतात…. काल मात्र रात्री 4:30 ला “शेरो-शायरी”ची बैठक बसली “वीर गुर्जर” साहेबांसोबत त्याची ही छोटीशी झलक…..'

या कॅप्शनसह जो व्हिडीओ कुशलने शेअर केला आहे ते देखील खूप भन्नाट आहे. या व्हिडीओमध्ये भाऊ कुशलला एक शायरी ऐकवायला सांगतो. कुशल खूप सुंदर शायरी ऐकवतो. त्यावर भाऊ म्हणतो काय चोख पाठांतर आहे तुझं. आणि तो कॅमेराचं फोकस समोरील ट्राफिककडे वळवतो. तर कुशलने जी शायरी म्हटलेली असते ती त्यांच्या गाडीसमोरील ट्रकवर लिहिलेली असते. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

SCROLL FOR NEXT