Ghabadkund Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ghabadkund: रहस्य-थराराचा 'घबाडकुंड'; कुशल बद्रिके घेऊन येतोय मराठीतला पहिला 'सस्पेन्स युनिव्हर्स'

Ghabadkund Marathi Movie: कुशल बद्रिके, देवदत्त नागे आणि इतर कलाकारांची दमदार फौज असलेला ‘घबाडकुंड’ चित्रपट मराठीत पहिल्यांदाच सस्पेन्स युनिव्हर्स सादर करणार आहे. रहस्य आणि थराराने भरलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shruti Vilas Kadam

Ghabadkund: हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये गाजलेली ‘सिनेमॅटिक युनिव्हर्स’ ही संकल्पना आता मराठी चित्रपटसृष्टीतही दाखल होत आहे. परस्परांशी जोडलेल्या कथानकांमधून वेगवेगळ्या चित्रपटांची एक मोठी आणि रंजक कथा मांडण्याचा अनोखा प्रयोग आगामी मराठी चित्रपट ‘घबाडकुंड’च्या माध्यमातून प्रथमच होत आहे. रहस्य, थरार आणि अनेक पात्रांना एकाच धाग्यात गुंफणारा हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा सिनेमॅटिक अनुभव देणार असल्याची चर्चा रंगली आहे.

निर्माते रसिक कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा महत्त्वाकांक्षी चित्रपट येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील पुन्हा एकदा वेगळ्या विषयासह प्रेक्षकांसमोर येत आहेत. भय, थरार आणि रहस्याचा संगम असलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट सादरीकरणाच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी खास ठरणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.

चित्रपटाच्या कथानकात आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमुळे काहींची स्वप्ने साकार होताना दिसतात, तर दुसरीकडे संशय आणि संकटांचा धोकादायक खेळ सुरू होतो. भीती आणि अनिश्चिततेच्या छायेत घडणाऱ्या या अकल्पित घटनांमुळे कथानक प्रत्येक टप्प्यावर नवीन प्रश्न निर्माण करते. सत्याच्या शोधात निघालेल्यांना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते आणि शेवटी नशिब जिंकते की माणूस, याची उत्कंठा प्रेक्षकांमध्ये निर्माण करणारा हा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे.

‘घबाडकुंड’मध्ये कलाकारांची दमदार फळी पाहायला मिळणार आहे. देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे आणि साहिल अनलदेवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

महिला दिनाच्या निमित्ताने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली. यावेळी चित्रपटाचा फर्स्ट लूकही सादर करण्यात आला. कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला तसेच एक आकर्षक फॅशन शोही सादर करण्यात आला.

लेखन संजय नवगिरे आणि अक्षय धरमपाल यांचे असून गीतकार नयूम पठाण आहेत. छायांकन योगेश कोळी, संकलन सौमित्र धाराशिवकर, कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांनी केले आहे. ‘घबाडकुंड’ हा चित्रपट मराठीसोबतच काही दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित होणार असून मराठीतील पहिल्या ‘युनिव्हर्स’ चित्रपटाचा अनुभव प्रेक्षकांना देण्यासाठी सज्ज झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! रिव्हॉल्व्हर साफ करताना गोळी सुटली; पोलीस उपअधीक्षक योगेश यांचा मृत्यू, पोलीस दलात खळबळ

Sunetra Pawar: अजितदादांच्या निधनाबद्दल माझ्या मनात शंका: सुनेत्रा पवार

Maharashtra News Live Update: पुण्यात आप्पा बळवंत चौकात पीएमपीएल बसचा अपघात

गोरगावच्या मोतीलाल नगर पुनर्विकासावरून राजकीय ठिणगी; राहिवाशांचा भाजप पदाधिकाऱ्यांवर आरोप

नेत्यांच्या बेडरूममध्ये गेल्याशिवाय ९० टक्के महिला राजकारण करू शकत नाहीत; खासदार पप्पू यादव यांचे वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT