Krrish 4: बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन लवकरच 'क्रिश 4' या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात त्याचा तिहेरी भूमिका असणार आहे, ज्यात तो नायक आणि खलनायक दोन्ही भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाची कथा टाइम ट्रॅव्हल म्हणजेच काळाच्या प्रवासावर आधारित असून, यात 'कोई मिल गया' मधील जादू या लोकप्रिय एलियनचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
चित्रपटाच्या कथानकात क्रिशला भूतकाळ आणि भविष्यकाळात प्रवास करत एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. या रोमांचक कथानकासाठी हायलेव्हल VFX आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच, चित्रपटात इमोशनल स्टोरी देखील पाहायला मिळणार आहे.
'क्रिश 4' मध्ये प्रीती झिंटा, प्रियंका चोप्रा, विवेक ओबेरॉय आणि रेखा यांसारख्या जुन्या कलाकारांची पुनरागमन होण्याची शक्यता आहे. तसेच, नोरा फतेही हिचीही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असू शकते, ज्यात तिचे काही अॅक्शन सीक्वेन्सेस असतील.
चित्रपटाच्या पटकथेचे काम पूर्ण झाले असून, ऋतिक रोशन आणि राकेश रोशन यांनी त्यावर अंतिम मान्यता दिली आहे. चित्रपटाचे शूटिंग फेब्रुवारी किंवा मार्च 2024 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.