Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam saam tv
मनोरंजन बातम्या

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam : 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी...' ला मिळाले घवघवीत यश; निर्मात्यांनी सीक्वलची घोषणा करत दिलं मोठं सरप्राइज

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Part 2 : 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपट जगभरात गाजत आहे. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. सविस्तर अपडेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'क्रांतिज्योती विद्यालय' चित्रपट 1 जानेवारी 2026ला रिलीज झाला.

'क्रांतिज्योती विद्यालय' चित्रपट हेमंत ढोमे दिग्दर्शित आहे.

'क्रांतिज्योती विद्यालय' चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपट आणि सिनेमातील गाणी सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. हा चित्रपट 1 जानेवारी 2026ला रिलीज झाला. चित्रपटात मराठी शाळा आणि मराठी भाषेबद्दलचे मत, विचार मांडले आहेत. ज्यामुळे चित्रपटाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळवले आहे. थिएटर हाऊसफुल पाहायला मिळत आहेत.

'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले. चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. आता 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

नुकतीच 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटाच्या यशाची जल्लोष साजरा करण्यात आला. या पार्टीला अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. ज्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या सोहळ्यात हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांनी 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा केली. ज्यामुळे प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला आहे. तसेच हेमंत आणि क्षितीने चाहत्यांना डबल सरप्राइज दिले आहे.

हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांनी सुपरहिट 'झिम्मा' फ्रँचायझीचा पुढचा भाग म्हणजे 'झिम्मा 3 'ची देखील घोषणा केली आहे. 'झिम्मा' आणि 'झिम्मा 2 ' ला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले आहे. आता हे दोन्ही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मात्र अद्याप कोणत्याही चित्रपटाची रिलीज डेट समोर आली नाही.

चित्रपटातील कलाकार

'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटात तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. यात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कराज चिरपुटकर, हरीश दुधाडे, कादंबरी कदम, क्षिती जोग, निर्मिती सावंत आणि प्राजक्ता कोळी हे झळकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Make Onion Oil: केसांच्या वाढीसाठी कांद्याचं तेल कसे बनवायचे?

Kalyan News : उल्हास नदी वाचवा, ग्रामस्थांकडून निषेधाची होळी; थेट दिला आंदोलनाचा इशारा

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचा हप्ताही लांबणीवर? लाडक्या बहिणींना कधी मिळणार १५०० रुपये? काय आहे नवी अपडेट

मुंबईत सराफा दुकानात ६.७९ कोटींची चोरी; ४५ दिवसांत गुन्ह्याचा उलगडा

CISF जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; डोंबिवली परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT