Kranti Redkar to Judge Show
Kranti Redkar to Judge Show Instagram @kranti_redkar
मनोरंजन बातम्या

Kranti Redkar to Judge Show: क्रांती रेडकर साकारणार नवी भूमिका; टीव्ही मालिकेत करतेय पुनरागमन

Pooja Dange

Kranti Redkar To Judge Show Dholkichya Talavar : अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. क्रांती तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. क्रांती अभिनयात सक्रिय नसली तरी ती पडद्यामागे महत्वाच्या भूमिका बजावत आहे. क्रांतीने निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.

क्रांती आता नव्या भूमिकेत दिसणारा आहे. नुकताच तिने आता एक शेअर केला आहे. कलर्स मराठी वाहिनीवर येणाऱ्या रिऍलिटी शोचा हा व्हिडिओ आहे. 'ढोलकीच्या तालावर' असे या कार्यक्रमाचे नाव असून लावणीवर हा कार्यक्रम आधारित आहे. (Latest Entertainment News)

क्रांती रेडकर या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहे. तर क्रान्तीसह या कार्यक्रम कोरिओग्राफर आशिष पाटील आणि दिग्दर्शक अभिजित पानसे देखील परिक्षणाची धुरा सांभाळणार आहेत.

क्रांतीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'महामंच सज्ज होतोय लावणीचा!! सन्मान लावणीचा… अभिमान महाराष्ट्राचा!!पहा ' ढोलकीच्या तालावर' १ जुलैपासून, शनि-रवि, रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही.'

क्रांतीने जत्रा, खो खो, ट्रकभर स्वप्न, शिक्षणाच्या आईचा घो या मराठी चित्रपटांसह गंगाजल या हिंदी चित्रपटातही (Movie) काम केलं आहे. काकण या चित्रपटाचं दिग्दर्शन क्रांतीनं केलं केले आहे. तर आगामी प्रोजेक्टवर तिचे काम सुरु आहे. समीर वानखेने क्रांतीचा पती असून या दोघांना दोन जुळी अपत्य आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

SCROLL FOR NEXT