KHC In Paresh Rawal Instagram
मनोरंजन बातम्या

Paresh Rawal In KHC: परेश रावल यांनी मराठी नाटकांबाबत केले महत्वाचे विधान; ‘कोण होणार करोडपती’मध्ये लावली हजेरी...

Kon Honaar Crorepati: बॉलिवूड चित्रपटांतील हुकूमी एक्का म्हणून ओळख असणारे परेश रावल आणि नाटकांची सेंच्युरी करणारे विजय केंकरे ‘कोण होणार करोडपती’मध्ये हजेरी लावणार आहेत.

Chetan Bodke

Marathi Televison Update: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत राहणारा ‘कोण होणार करोडपती’ हा शो सध्या कमालीचा चर्चेत आला आहे. नुकताच या टेलिव्हिजन शोचा आगामी सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी सचिन खेडेकर यांच्याकडे असून या शोमध्ये लवकरच एक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहे. बॉलिवूड चित्रपटांतील हुकूमी एक्का म्हणून ओळख असणारे परेश रावल आणि नाटकांची सेंच्युरी करणारे विजय केंकरे आजच्या भागात झळकणार आहेत. ते आजच्या भागात हजेरी लावणार असून त्याचा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

‘कोण होणार करोडपती’ या शोमध्ये सचिन खेडेकरांच्या समोर हॉटसिटवर आजच्या भागात परेश रावल आणि विजय केंकरे हजेरी लावणार आहेत. नुकताच सोशल मीडियावर टीझर शेअर करण्यात आला असून परेश रावल यांनी यावेळी मराठी नाटकांविषयी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. त्यांचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी त्यांनी एका संस्थेसाठी एकत्र येत खेळ खेळला. सध्या या दोघांची ही सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते परेश रावल पहिल्यांदाच एका मराठी शोमध्ये येणार असल्याने त्यांची सोशल मीडियावर चर्चा होते. गेली चार दशकं रंगभूमीवर कार्यरत असलेले ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि दिग्दर्शक विजय केंकरे देखील हजेरी लावणार आहेत, आपल्या विशिष्ट शैलीने प्रभावी नाटकं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे विजय केंकरे यांनी नुकतेच आपले शंभरावे नाटक प्रेक्षकांच्या समोर आणले.

परेश रावल आणि विजय केंकरे “ह्युमॅनिटेरिअन ॲड फाउंडेशन” या संस्थेसाठी ते खेळत होते. यांची मैफल सर्वांनाच पाहण्यासारखी असणार आहे.

‘कोण होणार करोडपती’च्या विशेष भागात परेश रावल यांनी मराठी नाटकांविषयी महत्त्वाचं वक्तव्य केलं. शोमध्ये परेश रावल म्हणतात, “मराठी थिएटर हे फार नाविन्यपूर्ण आहे. मराठी नाटकांची क्वालिटी ही सर्वांना शिकण्यासारखी आहे.” इतक्या मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटीनं मराठी नाटकांविषयी असलेलं प्रमे व्यक्त केल्याने सर्वांनीच त्यांचे कौतुक करत टाळ्या वाजवल्या. सोबतच पुढे परेश रावल मराठी नाटकाबद्दल काय बोललेत याची सर्वांनाच उत्सुकती आहे.

बॉलिवूड अभिनेते परेश रावल आणि मराठी भाषेचं कनेक्शन आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचं आणि मराठी भाषेचं नातं कसं आहे, हे आजच्याच भागात आपल्याला कळणार आहे. यावेळी परेश रावल यांनी मराठी भाषेवरील प्रेम आणि भाषेसोबतचे अनोखे नाते त्यांनी सांगितले. काही मराठी वहिनीच्या इतिहासात परेश रावल यांनी पहिल्यांदाच एखाद्या मराठी कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT