Ankita Walawalkar New Song Release Mother Father Reaction Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar Song Parents Reaction: आई सांगते नोकरी कर, बाबा म्हणाले लग्न कर...; ‘कोकण हार्टेड गर्ल’चं पहिलं गाणं पाहताच कुटुंबीयांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Ankita Walawalkar New Song Release: अंकिताच्या या पहिल्या म्युझिक व्हिडीओवर तिच्या आई-वडिलांनी प्रतिक्रिया दिली.

Chetan Bodke

Ankita Walawalkar New Song Release Mother Father Reaction

"दादर अभिमान गीता"च्या अभूतपूर्व यशानंतर प्रणिल आर्ट्स या निर्मिती संस्थेचा दुसरा म्युझिक व्हिडीओ आज विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. "तूच मोरया" असे या म्युझिक व्हिडीओचे नाव असून या गाण्यामध्ये आपल्या सर्वांची लाडकी कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि अभिनेता विशाल फाळे देखील या म्युझिक व्हिडीओमध्ये झळकणार आहे. अंकिताचा हा पहिला-वहिला म्युझिक व्हिडिओ आहे. अंकिताच्या या पहिल्या म्युझिक व्हिडीओवर तिच्या आई-वडिलांनी प्रतिक्रिया दिली.

अंकिताने गाणं प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या आई- वडीलांना तिचं ‘तूच मोरया’ गाणं कसं वाटलं याची प्रतिक्रिया शेअर केली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती आपल्या आई- वडीलांना ‘तूच मोरया’ या पहिल्या गाण्याचा व्हिडीओ दाखवताना दिसत आहे.

अंकिताने विचारलेल्या त्या प्रश्नावर तिचे आई- वडील म्हणतात, “अगं तुझं पहिलं गाणं खूपच छान आहे. पण त्यापेक्षा तू नोकरी केली असतीस, तर बर झालं असतं” असं अंकिताला तिची आई म्हणते. त्यानंतर तिचे बाबा गाण्याविषयी म्हणतात, “गाणं छान आहे. पण त्यापेक्षा तू लग्न कर.”

गाण्याविषयी सांगायचे तर, एका गावातील गरीब मराठी जोडप्याला बाप्पाचा साक्षात्कार अनोख्या पद्धतीने होतो आणि काबाडकष्ट करत असताना निराशेतून आशेचा किरण त्यांना देऊन जातो अशी या गाण्याची संकल्पना प्रणिल आर्ट्सचे निर्माते, दिग्दर्शक प्रणिल हातिसकर आहे. प्रणिल आर्ट्स ह्या संस्थेचे हे दुसरे पुष्प असून ह्या गाण्याचे गीतलेखन, गायन, निर्मिती, दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रणिल हातिसकर ह्यांनी एक हाती बजावली आहे. (Entertainment News)

"तूच मोरया"च्या निमित्ताने सोशल मीडियावरील आघाडीची तरुणी अंकिता वालावलकर नव्या क्षेत्रात दमदार पदार्पण करत असून अंकितासाठी हा एक मोठा ब्रेक ठरणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेला अंकिताचा ह्या गाण्यातील लूक सोशल मीडियावर प्रचंड गाजतो आहे. बाप्पाचे गाणं, त्याला गोष्टीनुरुप लाभलेली अनोखी विचारधारा, प्रणिलचे दिग्दर्शन, ताल धारायला लावणार संगीत, अंकिताचे पदार्पण, विशालची उत्तम साथ ह्यासर्व गोष्टींमुळे ह्या गाण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT