Sanjay Varma Death  Saam TV
मनोरंजन बातम्या

Sanjay Varma Death: 'कोई मिल गया' चित्रपटाचे एडिटर संजय वर्मा यांचं निधन; काही तासांपूर्वीच मिळाला होता नॅशनल अवॉर्ड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

National Award Winner Sanjay Varma Died:

बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट एडिटर संजय वर्मा यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. संजय बॉलिवूडच्या प्रसिद्ध एडिटर्सपैकी एक होते. संजय यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

संजय वर्मा यांनी हृतिक रोशनचे वडील राकेश रोशनच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच त्यांनी 'कोई मिल गया' या सुपरहिट चित्रपटाचे एडिटिंगही केले असून अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत.

निधनाच्या एक दिवस आधी संजय यांना त्यांच्या शेवटच्या गुजराती चित्रपट 'द लास्ट शो'साठी 69 वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट 2021 साली प्रदर्शित झाला होता आणि ऑस्करसाठीही शॉर्टलिस्ट झाला होता. इतकंच नाही तर त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 52 हून अधिक चित्रपटांचे एडिटिंग केले होते, त्यापैकी बहुतांश चित्रपट सुपरहिट ठरले.

संजय यांचे काम हृतिक रोशनच्या वडिलांचा खूप आवडायचे. त्यांनी राकेश रोशन यांचे 'खून भरी मांग', 'कोई मिल गया', 'कहो ना प्यार है' अशा अनेक चित्रपटांचे एडिटिंग केले आहे. याशिवाय त्यांनी शाहरुख खान आणि सलमान खानचा 'करण अर्जुन' चित्रपटही एडिट केला होता. दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाच्या फायनल लूकमागे संजय वर्मा यांचे योगदान होते.

संजय वर्मा यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 1996 मध्ये त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांनी 2000 मध्ये स्क्रीन अवॉर्ड आणि 2001 मध्ये आयफा अवॉर्ड देखील जिंकला आहे. संजयने 2017 मधील रिलीज कौन मेरा कौन तेरा आणि 2019 चे राजेश ए बब्बर दिग्दर्शित छोरियां छोरों से कम नहीं होती देखील एडिट केले होते. (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल

Eknath Shinde : CM शिंदे थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटाची सोमवारी ८० उमेदवारांची यादी जाहीर होणार

Maharashtra Politics: ठाकरे-काँग्रेसचं फाटलं? पत्रकार परिषदेत मविआतला विसंवाद चव्हाट्यावर; VIDEO

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्ता कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT