Koffee With Karan 8 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Koffee With Karan 8: ....म्हणून करीना कपूर तिचे चित्रपट पाहत नाही?, अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

Koffee With Karan 8 Latest Promo: करीनाने शोमध्ये ती तिचा कोणताही चित्रपट पाहत नाही, असा तिने खुलासा केला आहे.

Chetan Bodke

Koffee With Karan 8 Latest Episode

सध्या सोशल मीडियावर करण जोहरचा ‘कॉफी विथ करण ८’ हा शो प्रचंड चर्चेत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या सीझनचीही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. येत्या एपिसोडमध्ये बॉलिवूडमधल्या नणंद भावजया हजेरी लावणार आहेत. त्या नणंद भावजया म्हणजे, करीना कपूर खान आणि आलिया भट्ट. येत्या एपिसोडमध्ये आलिया आणि करीना हजेरी लावणार आहेत. नुकतंच त्याचा टीझर करणने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शोमध्ये करीना आणि आलियाने अनेक मजेदार किस्स्यांवर भाष्य केले आहे. करीनाने शोमध्ये ती तिचा कोणताही चित्रपट पाहत नाही, असा तिने खुलासा केला आहे. यामागील तिने कारणही सांगितले आहे. करीना कपूर खान म्हणाली की, “मला माझेच चित्रपट पाहून नर्वस वाटतं त्यामुळे मी स्वत:च माझे चित्रपट पाहत नाही. जेव्हाही माझे स्वतःचे चित्रपट पाहते त्यावेळी मला अस्वस्थ वाटतं, म्हणून मी चित्रपट न पाहणंच पसंद करते.” (Bollywood)

“मी अशा ठिकाणी आहे, जिथे मी खूप खुश आहे, शांत आहे, टेन्शन फ्री आहे आणि मुख्य बाब म्हणजे, सर्वकाही चांगले चालले आहे. जर मी स्वत:कडे पाहिले तर, मी नक्कीच स्वत:चे परिक्षण करायला सुरुवात करेल.” करीनाचे हे बोलणे ऐकून आलिया सुद्धा चकित झाली. यावर आलिया करीनाला तुझ्यामध्ये खूपच आत्मविश्वास आहे. (Bollywood News)

सोबतच यावेळी करिनाने भाऊजई आलिया भट्टलाही एक मजेशीर सल्ला दिला आहे. तुम्ही दोघांनीही आता दुसऱ्या मुलाचा विचार करावा. जेणेकरुन एक तुझ्याकडे तर दुसरा रणबीरकडे बाळ असेल. तर तुम्ही लवकरात लवकर तुमच्यातील वाद संपवावा. आलिया शोमध्ये म्हणाली होती की, माझ्यामध्ये आणि रणबीरमध्ये अनेकदा राहावरुन भांडणं होतात. राहासोबत सर्वाधिक वेळ कोण घालवतं ?, या मुद्द्यावरुन आमच्यात खूप भांडणं होतात. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune crime news: पुण्यात रक्तरंजित थरार! बायकोशी अफेअर असल्याचा संशय; नवऱ्याने तरुणाला क्रूरपणे संपवलं

Crime: हात-पाय बांधले, तोंडात कापड कोंबलं; नंतर महिलेला जागीच संपवलं, गावात उडाली खळबळ

लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाही, महिलांची e-KYC करण्यासाठी एकच झुंबड; अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: चालत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपी फरार; कोरेगाव पार्क पोलिसांची शोधमोहीम सुरू

Weekly Horoscope: या राशींना मेहनतीचे चांगले फळ मिळेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT