Radhika Apte Husband SAAM TV
मनोरंजन बातम्या

Radhika Apte Husband: राधिका आपटेचा नवरा ३०० कोटींचा मालक, कोण आहे Benedict Taylor?

Benedict Taylor : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेचा नवरा कोण आहे आणि त्यांच नातं कसं जुळलं जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने नुकतेच आपण आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. राधिका वयाच्या 39वर्षी आई होणार आहे. लग्नाच्या 12 वर्षांनी या दोघांना मुलं होणार आहे.

राधिका बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलला 'सिस्टर मिडनाइट' चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी गेली होती. तिथे ती रेड कार्पेटवर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली आहे. राधिकाच्या या गुड न्यूजमुळे चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

राधिका आपटेचा नवरा कोण?

राधिका आपटेने नुकतीच आई होण्याची बातमी दिली आहे. राधिकाने 2012मध्ये संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्नगाठ बांधली. बेनेडिक्ट टेलर (Benedict Taylor) हा ब्रिटीश व्हायोलिन वादक आहे. बेनेडिक्ट टेलरने रॉयल कॉलेज ऑफ म्युझिक अँड गोल्डस्मिथ कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. बेनेडिक्ट टेलर हा 'उडता पंजाब' या गाण्याचा संगीतकार आहे. हा हिंदी चित्रपट आहे.

या दोघांनीही कायमच आपल्या नात्याबद्दल गुप्तता ठेवली. ही दोघाही प्रसिद्धीपासून दूर राहीले. राधिका 2011मध्ये लंडनमध्ये बेनेडिक्टला भेटली. तिथे राधिका कंटेम्परी डान्स शिकण्यासाठी गेली होती. यावेळी तिची ओळख बेनेडिक्टशी झाली. बेनेडिक्ट टेलर हा लंडनमध्ये स्थायिक होता. यानंतर ती दोघ एकत्र बोलू लागली त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री झाली. मग या दोघांनी 2012 ला लग्नगाठ बांधली. राधिका आपटेचा नवरा ३०० कोटींचा मालक आहे.

राधिकाने आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. ती नुकतीच 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटात तिने कतरिना कैफ आणि दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती यांच्यासोबत काम केलं आहे. राधिकाही खूप स्पष्टवक्ती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उंच पाळणा बंद पडला, 30 ते 35 लोकांचा जीव टांगणीला, पाहा थरारक व्हिडिओ

Dhule : अतिक्रमण कारवाईत पोलिसांकडून मारहाण; भाजी विक्रेत्यांचा आरोप, संतप्त विक्रेत्यांनी केला रास्ता रोको

Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीवरून राजकारण पेटलं; राजू शेट्टींचं जुनं पत्र व्हायरल, पत्रात नेमकं काय लिहिलं?

Nashik News : ईडीचा माजी आयुक्ताला दणका; कोट्यवधींची मालमत्ता जप्त, एका कृत्याने संशय बळावला

Maharashtra Politics: सांगलीत राष्ट्रवादीचा बुरूज ढासळला, जयंत पाटलांचे विश्वासू भाजपात; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतलं 'कमळ'

SCROLL FOR NEXT