Subhedar  Instagram
मनोरंजन बातम्या

Subhedar Box Office Collection: सुभेदार चित्रपटाने पहिल्या विकेंडमध्ये किती गल्ला जमवला? जाणून घ्या

Subhedar Box Office Collection: सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा सांगणारा ‘सुभेदार’ या चित्रपट २५ ऑगस्टपासून सिनेमागृहात झळकत आहे.

Vishal Gangurde

Subhedar Box Office Collection Update:

सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा सांगणारा ‘सुभेदार’ या चित्रपट २५ ऑगस्टपासून सिनेमागृहात झळकत आहे. पहिल्याच वीकेंडला चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. या जबरदस्त यशानंतर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातही 'सुभेदार' चित्रपटाची बॅाक्स ऑफिसवर यशस्वी राहील, असा अंदाज वर्तवला जातोय. (Latest Marathi News)

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी याआधीच्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चित्रपटांच्या जबरदस्त यशातून त्यांची या विषयावरची आपली कमालीची पकड सिद्ध केली आहे. ‘सुभेदार’ चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर, गाण्यांमधून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. याच सुभेदार चित्रपटाने पहिल्या विकेंडमध्ये ५ कोटींहून अधिकची विक्रमी कमाई केली आहे.

दरम्यान, मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, दिग्पाल लांजेकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, रिषी सक्सेना, नूपुर दैठणकर, अर्णव पेंढारकर आदि मराठीतील दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत.

चित्रपटातील ‘मावळं जागं झालं रं’, ‘आले मराठे’, ‘हळद लागली रायबाला’ ही तीनही गाणी सध्या गाजतायेत. देवदत्त बाजी, अवधूत गांधी, सुवर्णा राठोड, रोहित राऊत, निधी हेगडे यांच्या स्वरांनी या चित्रपटातील गाणी सजली असून संगीतकार देवदत्त बाजी यांचे संगीत गाण्यांना लाभले आहे.

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन्स, मुळाक्षर प्रोडक्शन्स प्रा.लि, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन्स यांनी केली आहे.

प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT