Laapataa Ladies Day 4 Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Laapataa Ladies Day 3 Collection: ‘लापता लेडीज’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; कमी बजेट असलेल्या चित्रपटाने विकेंडला कमावले इतके कोटी

Laapataa Ladies Box Office Collection: बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसचा ‘लापता लेडीज’ चित्रपट रिलीज झाला आहे. सोशल ड्रामा कॉमेडी चित्रपटाला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Chetan Bodke

Laapataa Ladies Day 4 Box Office Collection

किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड चर्चा सुरू आहे. तर या चित्रपटाची निर्मिती आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसने निर्मित केलेला आहे. किरण राव आणि आमिर खानच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दिलासादायक प्रतिसाद मिळत आहे. कॉमेडी कथा असलेल्या या चित्रपटाला पहिल्याच विकेंडला दिलासादायक प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने पहिल्या तीन दिवसामध्ये, ४ लाखांच्या आसपास कमाई केली आहे. (Bollywood)

सोशल ड्रामा कॉमेडी आणि फॅमिली टच असलेल्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत रवी किशनसह प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, सविता मालवीय सह अनेक तगडी स्टारकास्ट आहे. ‘लापता लेडीज’ चित्रपट १ मार्च २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'लापता लेडीज' ही दोन नवविवाहित वधूंची कहाणी आहे. ज्या अचानक बेपत्ता होतात. किरण रावच्या दमदार कथेला कॉमेडीचा टच लावून हा चित्रपट प्रेक्षकांसमोर मांडला आहे. (Bollywood Film)

सॅकल्निकच्या अहवालानुसार, चित्रपटाने पहिल्या तीन दिवसामध्ये, ४ लाखांच्या आसपास कमाई केली आहे. पहिल्या दिवशी ७५ लाख, दुसऱ्या दिवशी १.४५ लाख तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने १.८० लाखांची कमाई केली आहे. चित्रपटाने चार दिवसांत जगभरामध्ये ४ लाखांहून अधिकची कमाई केली आहे. ‘लापता लेडीज’ या सोशल ड्रामा कॉमेडी आणि फॅमिली टच असलेल्या चित्रपटाला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची कथा चाहत्यांना भावली आहे. चित्रपटाची निर्मिती ५ कोटींमध्ये झाली आहे. (Social Media)

चित्रपटाचे दिग्दर्शन किरण रावने केले असून चित्रपटाची निर्मिती आमिर खान, किरण राव आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये मोठी गर्दी करत आहेत. या चित्रपटासोबतच मानुषी छिल्लरचा ‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. याशिवाय विद्युत जामवालचा 'क्रॅक' आणि यामी गौतमचा ‘आर्टिकल ३७०’ थिएटरमध्ये आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhimashankar : भीमाशंकर अभयारण्यातील पर्यटन स्थळांवर बंदी; पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाचा निर्णय

Festivals in 2025: २०२५ मध्ये कोणता सण कधी येणार जाणून घ्या संपूर्ण यादी!

स्कूल व्हॅन चालकाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; प्रायव्हेट पार्टला इजा अन् मारहाण, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: पुण्यात पीएमपी बसचा अपघात, दोन बस एकमेकांना धडकल्या

China–India relations: बेडकुळ्या फुगवणारा चीन भारताशी जवळीक का वाढवतोय? असू शकतात 'ही' कारणे

SCROLL FOR NEXT