kili paul viral video twitter
मनोरंजन बातम्या

Kili Paul Viral Video: टांझानियाच्या किली पॉलला मराठमोळ्या गाण्याची भुरळ; हरणीने केली वाघाची शिकार'वर केलेला डान्स VIDEO व्हायरल

Kili Paul and Neema Paul Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक गाणं जोरदार गाजतंय ते म्हणजे वाघाची शिकार एका हरणीनं केली

Ankush Dhavre

Kili Paul Dance On Dabkya Pavlanni Ali: सोशल मीडियाचा क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दररोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. एखादा नवीन चित्रपट रिलीज झाला किंवा गाणं रिलीज झालं की, त्या गाण्याची चर्चा सुरु होते.

त्यानंतर त्या गाण्यावर रिल्स बनायला देखील सुरुवात होते. सध्या सोशल मीडियावर एक गाणं जोरदार गाजतंय ते म्हणजे वाघाची शिकार एका हरणीनं केली. या गाण्यावर भन्नाट रिल्स जोरदार व्हायरल होत आहेत.

सोशल मीडिया उघडलं की, तुम्ही वाघाची शिकार एका हरणीनं केली या गाण्याचा एकतरी व्हिडिओ पाहिलाच असेल. अनेक सेलिब्रिटींनी देखील या गाण्यावर रिल्स शूट करून शेअर केले आहे. नुकताच जगप्रसिद्ध रिल्स स्टार किली पॉलने देखील या गाण्यावर रिल्स बनवून शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

सध्या हे गाणं चर्चेत असून हे गाणं युट्युबवर रिलीझ करण्यात आलं आहे. हे गाणं महाराष्ट्रात तुफान गाजतंय. दरम्यान आता हे गाणं साता समुद्रापार जाऊन पोहोचलं आहे.

हे गाणं व्हायरल होताच तांजानियाच्या किली पॉल आणि त्याच्या बहिणीला देखील या गाण्याची भुरळ पडली आहे.अनेक हिंदी आणि मराठी गाण्यांवर रिल्स शूट करणाऱ्या किली पॉल आणि त्याच्या बहिणीने वाघाची शिकार एका हरणीनं केली या गाण्यावर रिल्स शूट करून शेअर केला आहे. (Latest sports updates)

व्हिडिओ जोरदार व्हायरल..

हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. एका दिवसात हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. तसेच आतापर्यंत ४ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

या व्हिडिओवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रीया देताना दिसुन येत आहेत. यापुर्वी देखील या दोघांनी अनेकदा मराठी गाण्यावर रिल्स बनवुन शेअऱ केले आहेत. काही दिवसांपुर्वीच या दोघांचा बहरला हा मघुवास नवा या गाण्यावर डान्स केल्याचा व्हिडिओ शेअर केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol: आमदारांनी वेगळी भूमिका घेतली तीच राजकीय फूट; शिंदे गटाचा जोरदार युक्तीवाद, वाचा सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra News Live Update: आमदार राजेश पाडवी यांनी नाशिकमध्ये घेतली आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची भेट

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी! जुनी पेन्शन योजना परत येणार; 'या' राज्य सरकारच्या निर्णयाने खळबळ

Jio Recharge: खुशखबर! फक्त 666 रुपयांमध्ये इतक्या दिवसांची वैधता, Jio चा जबरदस्त रिचार्ज प्लान

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

SCROLL FOR NEXT