Kiara Advani- Siddharth Malhotra Pregnancy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiara Advani Pregnant: कियारा-सिद्धार्थच्या घरी येणार नवा पाहुणा; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

Kiara Advani- Siddharth Malhotra: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​लवकरच आई-बाबा होणार आहेत. या कपलने ही आनंदाची बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत एका खास पद्धतीने शेअर केली.

Shruti Vilas Kadam

Kiara Advani Pregnant: लवकरच आई- बाबा होणार आहेत. या कपलने त्यांच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आणि घोषणा केली की लवकरच त्यांच्या घरात बाळाच्या हास्याचा आवाज घुमणार आहे. या स्टार्सनी एक गोंडस फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांनीही हातात छोटे मोजे धरले होते. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, “आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट... लवकरच येत आहे.” चाहते आणि बॉलिवूड स्टार त्यांचे खूप खूप अभिनंदन करत आहेत.

कियारा आणि सिद्धार्थच्या प्रेग्नेंसीच्या बातमीवर बॉलिवूड स्टार्सनी काय म्हटले?

कियारा आणि सिद्धार्थच्या या घोषणेमुळे चाहते आणि बॉलिवूड स्टार्स उत्साहित झाले. ईशान खट्टरने लिहिले, अभिनंदन... तुम्हा दोघांनाही. शर्वरीने असेही लिहिले, “अभिनंदन”. नेहा धुपियाने कमेंट केली, “तुम्हाला अभिनंदन…. आतापर्यंतची सर्वात चांगली बातमी. हुमा कुरेशी, रिया कपूर आणि विक्रम फडणीस यांनीही कियारा आणि सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या. एका चाहत्याने लिहिले, “सर्वात चांगली बातमी... ऐकून मला खूप आनंद झाला.”

कियारा आणि सिद्धार्थ यांचे लग्न या दिवशी झाले

कियारा आणि सिद्धार्थ यांचे लग्न ७ फेब्रुवारी २०२३ रोजी जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये मोठ्या थाटामाटात झाले. त्यांच्या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही जवळचे मित्र त्यात सहभागी झाले होते. लग्नानंतर, या कपलने मुंबईत एका मेगा स्टार्सनी भरलेल्या रिसेप्शनचे आयोजन केले. यामध्ये आलिया भट्ट, नेहा धुपिया सारखे स्टार्स आले होते.

सिद्धार्थ आणि कियाराच्या लव्ह स्टोरीबद्दल अभिनेत्री अडवाणी काय म्हणाली?

कियारा अडवाणीने एका मुलाखतीत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले. ती म्हणाली, की सिडसोबत तिला नेहमीच घरी असल्यासारखे वाटते. मला फक्त एवढेच माहिती आहे की तो माझ्या स्वप्नांचा राजकुमार आहे. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, कियारा लवकरच रणवीर सिंगसोबत 'डॉन ३' मध्ये दिसणार आहे.तर, दुसरीकडे, सिद्धार्थ सध्या 'परम सुंदरी' चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

SCROLL FOR NEXT