Kiara Advani Buy New luxurious Car Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiara Advani Buy New Car: कियाराचा थाटच न्यारा, खरेदी केली ‘ही’ अलिशान कार; किंमत ऐकाल तर येईल आकडी

Kiara Advani New Luxurious Car: कधी चित्रपटाच्या माध्यमातून तर कधी फॅशनमुळे चर्चेत राहणारी कियारा सध्या अलिशान कारमुळे चर्चेत आाली आहे.

Chetan Bodke

Kiara Advani Buy New luxurious Car: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने फेब्रुवारी महिन्यात या जोडीने लग्नगाठ बांधत चाहत्यांना गुड न्यूज दिली. कधी चित्रपटाच्या माध्यमातून तर कधी फॅशनमुळे अभिनेत्री चर्चेत राहते. नुकतेच कियाराने एक गुड न्यूज दिली आहे. सोशल मीडियावर सध्या कियाराच्या नव्या गाडीचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. कियाराने Mercedes-Maybach S580 ही नवी अलिशान कार खरेदी केली आहे.

कियारा अडवाणी नुकतीच तिच्या नवीन कारसोबत फोटोंमध्ये दिसली. सोशल मीडियावर सध्या तिचे काही फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मर्सिडीज इंडियाने २०२२ मध्येच एस क्लास मेबॅच सेडान कार भारतात लाँच केली होती. नुकतीच तिच कार खरेदी करत कियाराने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. या कारची किंमत जर तुम्ही ऐकलीत तर तुमचे डोळे विस्फारतील.

सोशल मीडियावर कियाराच्या नव्या गाडीचा लूक रिव्हिल करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये कियारा तिच्या नव्या ब्लॅक रंगाच्या आकर्षक मर्सिडीज कारमधून बाहेर उतरत आहे. बाहेर येताच कियाराचे पापाराझींनी अभिनंदन करत तिच्या गाडीचे कौतुक केले. फोटोग्राफर्सनं केलेल्या अभिनंदनाचा कियारानं हसतमुखाने स्वीकार केला. या स्पेशल मुव्हमेंटवेळी कियाराने पांढऱ्या रंगाचा टँक टॉप आणि प्रिटेंड कोऑर्ड सेट परिधान केला होता. कियारानं सुमारे 2.69 कोटी रुपयांची आलिशान Mercedes-Maybach S580 ही गाडी विकत घेतली आहे.

कियाराकडे इतर अनेक अलिशान कार देखील आहेत, ज्यात Audi A8L, Mercedes Benz E- Class आणि BMW X5 या अलिशान गाड्यांचा समावेश आहे. या कारची किंमत जवळपास 98 लाख रुपयांपासून ते 1.61 कोटी रुपयांपर्यंत आहे. 2021 मध्ये कियारा अडवाणीने एक कार खरेदी केली होती, ज्याची किंमत करोडोंची होती. रिपोर्ट्सनुसार, कियारा अडवाणीची एकूण संपत्ती 32 कोटी रुपये आहे. ती आपल्या अभिनयानुसार एका चित्रपटासाठी 3 कोटी रुपये इतके मानधन आकारते.

कियारा अडवाणी आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे असून तिचे अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. लवकरच येत्या काही दिवसात कियारा ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे, तर ती ‘गेम चेंजर’मध्ये साऊथ स्टार राम चरणसोबत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT