Anushka Sen 
मनोरंजन बातम्या

Anushka Sen: 'खतरों के खिलाडी' फेम अभिनेत्रीची 22 व्या वर्षी गगनभरारी; मुंबईत घेतलं हक्काचं घर

Anushka Sen New House Photos: सोशल मीडियावर अनुष्कानं पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर तिच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Manasvi Choudhary

बालकलाकार म्हणून कायमच चर्चेत राहिलेली सोशल मिडिया इनफ्ल्युएसंर अनुष्का सेन तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे. अनुष्कानं मुंबईत तिचं स्वताचे घर खरेदी केले आहे. अत्यंत कमी वयात अनुष्कानं तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे. सोशल मीडियावर अनुष्कानं पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर तिच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अनुष्का सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. विविध फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच अनुष्काने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर नवीन घराचे फोटो शेअर केले आहेत. घराच्या व्हिडीओमधून सुंदर असा नैसर्गिक नजारा देखील दिसत आहे. अनुष्कानं घराची पूजा देखील केली आहे. संपूर्ण कुटुंबासह हे फोटो देखील तिने शेअर केले आहेत. फोटोंना अनुष्काने 'गृहप्रवेश, नवीन सुरुवात, नवीन घर, तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी राहूद्या. ओम नमः शिवाय.' असं लिहिलं आहे.

अनुष्काने तिच्या कामाची सुरूवात २००९ मध्ये अनुष्काने बालकलाकार म्हणून केली. अनुष्काने अनेक जाहीराती आणि म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले आहे. 'यहाँ में घर घर खेली' या मालिकेतून बालकलाकार म्हणून अनुष्काने तिच्या करिअरची सुरूवात केली. अनुष्काला 'बालवीर' या मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे खरी लोकप्रियता मिळाली आहे. 'झाँसी की रानी' आणि 'खतरों के खिलाडी सीजन ११' मध्ये दिसली आहे. याशिवाय तिने 'दिल दोस्ती दुविधा' या मालिकेतही काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT