Kerala Film Producer Joby George Saam Tv
मनोरंजन बातम्या

Film Producer Arrested: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला २ वर्षांची कोठडी; फसवणूक प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल

Film Producer Arrested: केरळमधील चित्रपट निर्माते जॉबी जॉर्ज यांना लाखो रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निर्मात्यावर कोणते आरोप केले आहे जाणून घेऊयात.

Shruti Vilas Kadam

Film Producer in Jail: कोची येथील न्यायालयाने केरळ चित्रपट निर्माते जॉबी जॉर्जला फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांमध्ये दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सबरीनाथन पी. यांनी जॉबी जॉर्ज (४९)ला परदेशात नोकरी आणि व्यवसायाची संधी देण्याच्या फसवणुकीच्या दोन गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आहे.

निर्मात्याची पत्नी आणि आई निर्दोष मुक्त

शनिवारी न्यायालयाने निर्माते जॉबी जॉर्जची आई अॅलिस जॉर्ज आणि पत्नी सुनीमोल यांना दोन्ही प्रकरणांमध्ये निर्दोष मुक्त केले. जॉर्ज हा 'किष्किंधा कंदम', 'कावल' आणि 'शायलॉक' यासह अनेक मल्याळम चित्रपटांचा निर्माता असून या प्रकरणात आरोपी असल्याचे कोर्टाला आढळले.

काम देण्याचे आश्वासन देऊन लाखो रुपयांची फसवणूक

जॉबी जॉर्ज हा बिजू वर्गीस आणि डार्ली बिजू या कपलची १०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल दोषी आढळला आहे. निर्मात्याने त्यांना लंडनमध्ये व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्याचे, भागीदारी आधारावर न्यूकॅसलमध्ये परवाना नसलेले दुकान उघडण्याचे आणि यूकेच्या एका महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आश्वासन दिले. २०१० मध्ये त्याने या कपलकडून १७.७५ लाख रुपये घेतले होते. मुलांथुरुथी पोलिसांनी सुरुवातीला २०१२ मध्ये गुन्हा दाखल केला होता. जो नंतर २०१३ मध्ये गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. न्यायालयाने अखेर जॉबी जॉर्जला दोन वर्षांची शिक्षा आणि १६.५२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दुसऱ्या प्रकरणात शिक्षा

न्यायालयाने निर्मात्याला आणखी एका फसवणुकीच्या प्रकरणातही दोषी ठरवले आहे. हा खटला २०११ ते २०१२ दरम्यान घडला. निर्मात्याने राजेश मॅथ्यू नावाच्या व्यक्तीला युकेला कामगार व्हिसा देण्याचे आश्वासन देऊन ५० लाख रुपयांची फसवणूक केली. हा खटला २०१२ मध्ये मुवट्टुपुझा पोलिसांनी नोंदवला होता. या प्रकरणातही न्यायालयाने निर्मात्याला दोन वर्षांची शिक्षा आणि ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला. नंतर, न्यायालयाने निर्मात्याला उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी दिली आणि शिक्षेत एक महिन्यासाठी स्थगिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Orange Ice Cream : विकतचं कशाला? मुलांसाठी घरीच बनवा संत्र्याचं आईस्क्रीम; जिभेवर रेंगाळेल चव, वाचा सोपी रेसिपी

Aamir-Sunny Movie : आमिर खान अन् सनी देओलच्या 'लाहोर १९४७' चित्रपटाचे नाव बदलले; रिलीज डेट आली समोर, नवीन शीर्षकाने वेधलं लक्ष

Maharashtra Live News Update : अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीत सिंग याची चौकशी करू नका, शरद पवार पक्षाची मागणी

Crime: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अपहरण करून ३ दिवस डांबून ठेवलं; ६ जणांनी शरीराचे लचके तोडले

Share Market Crash : सर्वात मोठी घसरण, शेअर मार्केटमध्ये काही सेकंदात १२ लाख कोटी बुडाले;रूपयाही घसरला अन् क्रूड ऑइलही महागले

SCROLL FOR NEXT