KBC 16 Super Sawaal  Saam Tv
मनोरंजन बातम्या

KBC 16 Super Sawaal : 'कौन बनेगा करोडपती'च्या नव्या पर्वात होणार मोठे बदल, स्वतः अमिताभ बच्चन यांनी सांगितले नियम

KBC 16: सोनी एंटरटेनमेंट वाहिनीवर KBC16 चा एक नवीन प्रोमो व्हिडिओ रिजील झाला आहे,ज्या प्रोमो व्हिडिओत अमिताभ बच्चन सांगता आहेत की, येणाऱ्या नवीन शोमध्ये कसे नवीन बदल कोणता बदल झालेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेला प्रसिद्ध रिअॅलटी क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती'सुरु झाल्यापासून अनेक बदल झाला आहे.या दरम्यान निर्मात्यांनी शोमध्ये बरेच बदल केलेले आहेत ज्यांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले आहे आणि त्यांच्याबद्दल अनेक चर्चाही झाली आहे. या वर्षीच्या परवातही निर्मात्यांनी काही बदल केले आहेत जे सहभागी खेळाडूंसाठी फायदेशीर ठरु शकतात, परंतू जर चूक झाली तर त्याचे नुकसानही होऊ शकते. चला तर मग आज जाणून घेऊयात त्या खास बदलाबद्दल ज्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी KBC १६ च्या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये सांगितले गेले आहे.

बक्षिसाची रक्कम एकाच वेळी होईल दुप्पट

सोनी एंटरटेनमेंट वाहिनीवर KBC(KBC)१६ चा एक नवीन प्रोमो व्हिडिओ रिजील झाला आहे,ज्या प्रोमो व्हिडिओत अमिताभ बच्चन सांगता आहेत की, येणाऱ्या नवीन शोमध्ये कसे नवीन बदल होत आहेत आणि आता एका नवीन बदल अंतर्गत, शोमध्या सुपर प्रश्न जोडण्यात येणार आला आहे. सुपर प्रश्न खेळाडूंनी निवडल्यावर, खेळाडूंना एक प्रश्न विचारण्यात येईल ज्यामध्ये त्यांना त्या प्रश्नासाठी कोणताही पर्याय नसेल. या प्रश्नाचे अचूक उत्तर दिल्यास, खेळाडूंना दोन पर्याय वापरण्याची मूभा मिळेल ज्याद्वारे खेळाडूंना त्यांचे पैसे एकाच वेळी दुप्पच करण्याची संधी मिळेल.

तुम्हाला सुपर प्रश्नावर कोणताही पर्याय मिळणार नाही

प्रोमो व्हिडिओमध्ये अमिताभ(bachchan) बच्चन म्हणतात की,'बंधू आणि सज्जनांनो,हे या वर्षातील नवीन बदलाचे लक्षण आहे. केबीसी त्याच्या पर्यायांसाठी ओळखला जातो. चार पर्यायांसह एक प्रश्न मात्र पहिल्यांदा कॉम्प्युटर जीने सुपर प्रश्नासाठी चार पर्यायांचा त्याग केलेला दिसून येतो. या सर्वाचा अर्थ आत त्यांच्यासमोर एक सुपर प्रश्न असेल आणि त्यात कोणताही पर्याय नसेल . जर खेळाडूंनी या प्रश्नाचे बरोबर दिले तर ते स्वत:ला एक सुपर पॉवर आणि दोन पर्याय प्राप्त करु शकतील.

खेळाचा थरार

अमिताभ बच्चन नवीन प्रोमो(Promo) व्हिडिओत म्हणतात- दोन पर्याय प्रेक्षकांसाठी अशी संधी आहे जी एका झटक्यात प्रश्नाचे प्रमाण दुप्पट करते. खेळाडूंना हे करण्यासाठी येथे उपस्थिक असलेले हे बझर बटण दाबावे लागेल. प्रोमो व्हिडिओमध्ये खेळाडूंना बझर दाबून दोनपर्याय सक्रिय करताना दाखवले आहे. सध्या प्रेक्षण येणाऱ्या पर्वासाठी उस्तुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shakun Shastra: घरात तुमच्या हातून या ५ गोष्टी पडणं मानलं जातं अशुभ; भविष्यातील घटनांचे मिळतात संकेत

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये धावत्या टिप्परला लागली आग

Madhavi Nimkar: चाळीशीतल्या माधवी निमकरचं आरस्पानी सौंदर्य, फोटो पाहून काळीज धडधडलं...

Pudina Chutney Recipe: उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवणारी पुदीना चटणी कशी बनवायची?

Blood Pressure : झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण कराच, BP अन् आणि शुगर राहील कंट्रोलमध्ये; नव्या संशोधनातून महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT