KBC 16 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिऍलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती १६’ मध्ये येत्या शुक्रवारी ‘वनवास’ या आगामी चित्रपटाचे कलाकार नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा उपस्थित राहणार आहेत. या भागात नाना पाटेकर महानाय अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉटसीटवर बसणार आहेत. या भागात नाना पाटेकर नाम फाऊंडेशनसाठी सह हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक किस्से आणि आठवणी सांगून हा एपिसोड नक्कीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे.
केबीसीचा खेळ रंगत असताना नाना पाटेकर यांनी ‘नाना’ शब्दाशी निगडीत एक गंमतीदार किस्सा सांगितला. ते म्हणाले, “आम्ही ‘कोहराम’ चित्रपटाचे शूटिंग करत होतो. एक दिवस अमित यांनी सेटवर सर्वांनाच मिठाई वाटली. मी त्यांना विचारलं की काय स्पेशल आहे? त्यावर ते म्हणाले, “मी आजोबा झालो, माझ्या मुलीला बाळ झाले, मी नाना झालो!” त्यावर आपल्या विनोदबुद्धीने ओळखल्या जाणाऱ्या नानांनी टिप्पणी केली की, “किती तरी वर्षं झाली, मी तर जन्मापासूनच नाना आहे.” तसेच पुढे, शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता आणून त्यासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नाम फाऊंडेशनची सुरुवात केल्याचेही नाना यांनी सांगितले.
किस्से सांगताना नाना पाटेकरांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या एका सुंदर आठवणीला उजाळा दिला. ते म्हणाले, “एक दिवस अमितजी एक मस्त शर्ट घालून आले होते. मी त्यांच्या शर्टाचे कौतुक केल्यावर ते म्हणाले की तो अभिषेकचा शर्ट आहे. संध्याकाळी अमितजी निघून गेल्यानंतर मला निघायला जरा उशीर झाला होता. माझ्या शूटनंतर जेव्हा मी माझ्या व्हॅनिटीमध्ये गेलो, तेव्हा तो शर्ट तिकडे हँगरवर लावून ठेवला होता. आजही तो शर्ट माझ्याकडे आहे.”
नाना पाटेकरांचा आगामी चित्रपट वनवास येत्या २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात नानांसह उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर हे नवोदित कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.