Kaun Banega Crorepati 16 Saam Tv
मनोरंजन बातम्या

KBC 16 : ५० लाखांच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का?

Kaun Banega Crorepati 16: छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' चा 16 वा सिझन सुरू आहे. अमिताभ बच्चन यांनी 50,00,000 लाखांसाठी स्पर्धक शालिनी शर्मा यांना प्रश्न विचारला आहे.

Manasvi Choudhary

छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' चा 16 वा सिझन सुरू आहे. या शोचे सुत्रसंचालन अमिताभ बच्चन करत आहेत. या शोमध्ये अमिताभ बच्चन हे स्पर्धकांना प्रश्न विचारतात. विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तर दिल्यास विजेते स्पर्धक लाखो- रूपये जिंकतात.

नुकताच 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमात शालिनी शर्मा सहभागी झाल्या होत्या. शालिनी या मूळच्या दिल्लीच्या आहेत. 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमात सहभागी होण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्या दिल्लीहून मुंबईत फक्त या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. या कार्यक्रमात शालिनी शर्मा यांनी त्यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले. गेल्या १६ वर्षांपासून माझी कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा होती. ती इच्छा आज माझी पूर्ण झाली, असं त्यांनी सांगितले.

शालिनी शर्मा यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नवस केला होता. कधी आयुष्यात 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात जाण्याची संधी मिळाली तर अनवानी जाईन आणि कुलदेवीचे दर्शन घेतल्यानंतरच पायात चप्पल घालेन. त्यामुळे त्या दिल्लीहून अनवाणी आल्या होत्या.

पुढे त्यांनी सांगितले की, शालिनी शर्मा यांनी त्यांचा १८ वर्षाचा मुलगा आहे ज्याला जन्मापासूनच फिट येण्याचा त्रास असल्याचं सागितलं. तसेच त्याला ऑटिझमसारखा आजारही आहे. पण यानंतरही शालिनी यांनी हार न घेता आपला प्रवास सुरू ठेवला आहे. कौन बनेगा करोडपती या शोमध्ये जिंकून त्यांना मुलावर उपचार करायचे आहे. असेही सांगितले. शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनाही त्यांची ही कहाणी ऐकूण वाईट वाटले. शालिनी यांनी या शोमधून 25,00,000 रूपये जिंकले. मात्र त्यांना विचारण्यात आलेला 50, 00,000 प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. प्रश्न नेमका काय आहे ते पाहूया.

अमिताभ बच्चन यांनी 50,00,000 लाखांसाठी शालिनी शर्मा यांना 'नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकण्यापूर्वी कोणत्या भारतीय महिलांनी आशियाई क्रिडा स्पर्धेत भालाफेकमध्ये रौप्य आणि कास्यपदक जिंकले होते?' असा प्रश्न विचारला होता.या प्रश्नाचे अचूक उत्तर A एलिझाबेन डेव्हनपोर्ट असे आहे. मात्र, शालिनी यांना या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. म्हणून त्यांनी हा खेळ सोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT