katrin kaif and vicky kaushal katrin kaif Instagaram
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif : समुद्र किनारा, जंगलसफारी आणि मित्रपरिवार; कतरिना कैफने शेअर केले पती विकी कौशलसोबत रोमँटिक फोटो

Katrina Kaif : कतरिना कैफ बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. मात्र अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर ख्रिसमसच्या सुट्टीचे फोटो शेअर केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Katrina Kaif : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफने अलीकडेच पती-अभिनेता विकी कौशलसोबत सुट्टीसाठी परदेशी गेली आहे. या दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या जोडीची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. आता अभिनेत्रीने पतीसोबत क्वालिटी टाइम घालवतानाचे फोटो शेअर केले आहेत. त्यावर चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत.

कतरिनाचे नुकतेच शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये कतरिना विकीला मिठी मारताना दिसत आहे आणि ती तिच्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसत आहे.

कतरिनाची पोस्ट व्हायरल होत आहे

अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडे, तिने तिच्या इंस्टाग्रामवर हॉलिडे फोटो 'कुटुंब, मित्र आणि ब्रिटिश जंगली क्षेत्रे… असे कॅप्शन लिहून फोटो शेअर केलं आहेत. एका फोटोमध्ये कतरिना कैफ विकी कौशलला मिठी मारताना दिसत आहे, तर दुस-या फोटोमध्ये दोघेही हसत हसत कॅमेऱ्याकडे पोज देताना दिसत आहेत.

समुद्रकिनाऱ्यावर कुटुंबासह केली मजा

समोर आलेल्या या फोटोंमध्ये कतरिना तिच्या कुटुंबासोबत बीचवर सुंदर वेळ घालवताना दिसत आहे. यादरम्यान विकी आणि कतरिनाने काळ्या रंगाचे पोशाख परिधान केले आहेत. एका छायाचित्रात हे कपल सुंदर सुंदर ठिकाणी फिरताना दिसत आहेत. तर इतर फोटोंमध्ये ती आपल्या मित्रांसोबत पोज देताना दिसला. अलीकडेच, विक्की कौशलने स्वतःचा आणि कतरिनाचा समुद्रकिनारी आराम करतानाचा फोटो पोस्ट केला होता.

विकीने पॉज असे कॅप्शन टाकून हा फोटो पोस्ट केला होता. याआधीही कतरिना तिच्या लेटेस्ट पोस्टने इंटरनेटवर लोकप्रिय झाली होती. अभिनेत्रीने काही वेळापूर्वी ख्रिसमस सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर केला होता. जर आपण कतरिना कैफच्या चित्रपटांबद्दल बोललो तर तिच्याकडे फरहान अख्तरचा 'जी ले जरा' चित्रपट काम करत आहे, ज्यामध्ये प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट मुख्य देखील भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT