Kartik Aaryan Sweet Gesture For Co-Star Kiara Advani Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiara Advani - Kartik Aaryan Video : आधी चप्पल उचलली, मग आधार दिला... कार्तिक आर्यनने असं काय केलं ज्याचं सोशल मीडियावर होतंय इतकं कौतुक

Kiara Advani - Kartik Aaryan Dance Video: कियारा आणि कार्तिक त्यांचे नवीन गाणे सुन सजनी लाँच झाले.

Pooja Dange

Kartik Aaryan Sweet Gesture For Co-Star Kiara Advani : कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी सध्या चर्चेत आहेत. 'भूल भुलैया 2' च्या प्रचंड यशानंतर ही जोडी 'सत्यप्रेम की कथा' चित्रपटामध्ये झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रेक्षक पुन्हा मोठ्या पडद्यावर या ऑन-स्क्रीन जोडीला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. सध्या हे दोघे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

बुधवारी कियारा आणि कार्तिक त्यांचे नवीन गाणे सुन सजनी लाँच झाले. या कार्यक्रमादरम्यान कियारा आणि कार्तिकने मीडियासाठी लाईव्ह परफॉर्म देखील केले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या डान्स परफॉर्मन्सनंतर, कियारासाठी कार्तिकच्या गोड केमिस्ट्रीने सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. (Latest Entertainment News)

नवीन गाण्यात कार्तिक आणि कियारा यांनी गरबा केला आहे. तर लाँच कार्यक्रमात दोघांनी गरबा मूव्ह्स केल्या आहेत. इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्यासाठी कियाराने तिचे हील्स काढले. त्यानंतर दोघांनी मस्त एनर्जेटिक परफॉर्मन्स दिला. डान्स करून झाल्यानंतर अभिनेत्रीला हिल्स घालण्यासाठी कार्तिकने तिला मदत केली.

कार्तिकने कियाराच्या हिल्स घातल्या आणि तिच्या समोर आणून ठेवल्या. जेणेकरून ती लगेच त्या घालू शकेल. इतकंच नाही तर ती हिल्स घालत असताना त्याने तिचा हात धरला, जेणेकरून तिचा तोल जाणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर व्हायरल झाला आहे. तर नेटकरी त्याच्या या वागणुकीचे कौतुक करत आहेत.

नेटकरी कार्तिकच्या या वागणुकीवर प्रतिक्रिया देखील देत आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे, "जंटलमन @TheAaryanKartik सर." दुसर्‍या नेटकाऱ्याने लिहिले, "ए मॅन वेल राईज्ड." तर अनेक नेटकऱ्यांनी कार्तिकच्या या व्हिडिओ हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आहेत.

कार्यक्रमादरम्यान, कियाराने शेअर केले आहे की, ती आणि कार्तिक, जेव्हा ते भूल भुलैया 2 चे शूटिंग करत होते तेव्हापासून ते आतापर्यंत व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या खूप चांगले फ्रेंड झाले आहेत. ती म्हणाली, "मी कार्तिकला ओरडायचे, त्याला सांगायचे की यावेळी उशीरा येऊ नकोस आणि मला वाट पाहायला लावू नकोस. आम्ही आता बदललो आहोत, मला वाटते तो एक वेगळा चित्रपट होता."

सत्यप्रेम की कथा समीर विद्वांस दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 29 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना भाऊबीज कधी मिळणार? ऑक्टोबर हप्त्याबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्वाची अपडेट

Morning symptom of cancer: सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिलं दिसतं कॅन्सरचं हे लक्षण; 99% लोकं करतात इग्नोर

Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला बायकोने नवऱ्याला का ओवाळावे? जाणून घ्या जुनं शास्त्र

Diwali Photo Tips: दिवाळीत फोटो कसे क्लिक करावे? प्रोफेशनल लुकसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स

Thamma OTT Release : रश्मिकाचा 'थामा' चित्रपट ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार? वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT