Shehjada Film Twitter Review Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shehjada Twitter Review: हवा शेहजादाचीच! कार्तिक-क्रितीच्या जोडीवर प्रेक्षक फिदा, चित्रपटावर होतोय कौतुकाचा वर्षाव

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ट्विटरवर अनेक यूजर्सनी 'शेहजादा'बद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Chetan Bodke

Shehjada Twitter Review: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा चित्रपट 'शेहजादा' आज 17 फेब्रुवारी 2023 ला प्रदर्शित झाला आहे. कार्तिक आर्यन, क्रिती सेनॉन, मनीषा कोईराला, परेश रावल, रोनित रॉय आणि सचिन खेडेकर हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती रोहित धवनने केली असून, रोहित धवनसोबत कार्तिकचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ट्विटरवर अनेक यूजर्सनी 'शेहजादा'बद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सिद्धार्थ कन्नन यांनी चित्रपटाचे वर्णन मनोरंजनाचा पूर्ण डोस म्हणून केले आहे, निर्मात्यांच्या मते हा चित्रपट विनोदी, रोमान्स आणि ड्रामाने परिपूर्ण आहे. या सगळ्यात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ट्विटरवर अनेक यूजर्सनी 'शेहजादा'बद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजर म्हणतो, "सॉलिड फॅमिली एन्टरटेनर, कार्तिक आर्यन अप्रतिम भूमिकेत आहे. कीर्ती सॅनन ग्लॅम्स दिसत असून परेश रावल एक धूर्त आहे. गाणीही चांगली आहेत."

तर आणखी एक युजर म्हणतो, "शेहजादा चित्रपट बऱ्यापैकी खूप चांगला आहे. टाईमपास चित्रपट. कार्तिक आर्यनची ओव्हर अॅक्टिंग कमी आहे. क्रिती सॅनन एकदम मस्त आहे." दुसरा युजर म्हणतो, "शेहजादा मॅसी से फुल है, कार्तिक आर्यनने सिंगल हँड सेव्ह. त्याची वेगळी स्क्रीन प्रेझेन्स आणि डायलॉग डिलिव्हरी हे सिद्ध करते की नक्की हा चित्रपट हिट ठरणार आहे. परेश रावलची भूमिका दमदार होती. क्रिती सेनन खूपच सुंदर दिसत आहे. आकर्षक संगीत आणि उत्तम कॅमेरावर्क."

'शेहजादा' हा 2020 मध्ये आलेल्या तेलगू चित्रपट 'अला वैकुंठपुरमुलो'चा हिंदी रिमेक आहे. अल्लू अर्जुनने या मूळ चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती, हा चित्रपट देखील खास आहे कारण कार्तिक पहिल्यांदाच अॅक्शन अवतारात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Christmas Celebration : भारतात ख्रिसमस कसा साजरा केला जातो? जाणून घ्या

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं; बॉयफ्रेंडला अटक

Western Railway : पश्चिम रेल्वेवर 'या' दिवशी ३०० लोकल रद्द! नेमकं कारण काय? जाणून घ्या

Cracking knuckles: हाताची बोटं कटकट मोडण्याची सवय आहे; संधिवात होऊ शकतो? डॉक्टरांनी काय सांगितलं? वर्षानुवर्षे मनात असलेला गैरसमज होईल दूर

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रुपसिंग नाईक यांचे निधन...

SCROLL FOR NEXT