Kartik Aaryan mother drop a hint about his dating rumours with Sreeleela  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan: कार्तिक आर्यन कोणाला करतोय डेट? आईनेच केला मोठा खुलासा

Kartik Aaryan Dating News: कार्तिक आर्यनच्या आईने तिच्या मुलाच्या डेटिंगच्या अफवांना दुजोरा दिला आहे. तसेच त्यांना कशी सून पाहिजे याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Shruti Vilas Kadam

Kartik Aaryan: बॉलीवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यन त्याच्या चित्रपटामुळे आणि त्याच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. या काही वर्षात अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीन्सोबत त्याचे नाव जोडले गेले आहे. त्यात भर म्हणजे सध्या त्याचे नाव पुष्पा २ फेम किसिक गर्ल श्रीलीला सोबत जोडले जात आहे. कार्तिकच्या फॅमिल पार्टीमध्ये श्रीलीला सहभागी झाली होती तेव्हापासून त्यांच्या अफेरच्या चर्चा रंगू लागल्या आणि आता स्वतः कार्तिक आर्यनचाय आईने याबाबत मोठा खुलासा केला आहे.

'भूल भुलैया २' चा अभिनेता सध्या दक्षिणेतील अभिनेत्री श्रीलीलासोबत रिलेशनशिपमध्ये अशा अफवा पसरत आहेत. या अफवांना खतपाणी घालत, कार्तिकची आई माला तिवारी यांनी नुकत्याच झालेल्या आयफा अवॉर्ड्स २०२५ दरम्यान असे काही सांगितले ज्यामुळे चाहते आश्चर्यचकित झाले. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या एका क्लिपमध्ये, कार्तिकच्या आईला तिच्या भावी सुनेकडून असलेल्या अपेक्षांबद्दल विचारण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना माला तिवारीने सांगितले की तिला तिच्या मुलाची पत्नी म्हणून एक चांगली डॉक्टर पाहिजे.

कार्तिकच्या आईने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, "कुटुंबात एक चांगली डॉक्टर आली पाहिजे." नेटिझन्स त्यांच्या वक्तव्याला त्यांच्या मुलाच्या कथित गर्लफ्रेंडसोबत जोडत आहेत. कारण श्रीलीला देखील डॉक्टरीचे शिक्षण घेत आहे. कार्तिकच्या आईच्या अलिकडच्या विधानामुळे कार्तिक आणि श्रीलीलाच्या नात्याबद्दलच्या चर्चांना उधाण आले आहे.

काही काळापूर्वी, कार्तिकच्या कुटुंबाच्या पार्टीत श्रीलीला मजा करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या क्लिपमध्ये ती कार्तिकच्या घरातील पार्टीत नाचताना दिसत होती. माहितीनुसार, कार्तिक आणि त्याच्या कुटुंबाने त्याची बहीण डॉ. कृतिका तिवारी डॉक्टर झाल्याबद्दल पार्टी ठेवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

SCROLL FOR NEXT