Karishma Kapoor In Fifa World Cup  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Karishma Kapoor: करिश्माचीही फिफा वर्ल्डकपच्या फायनलला हजेरी, सिंपल लूकने वेधले साऱ्यांचे लक्ष...

सध्या फिफा वर्ल्ड कप सर्वत्र कमालीचा चर्चेत आहे. त्यातल्या त्यात बॉलिवूड सेलिब्रिंटीनी तर त्याची उत्सुकता वाढवली होती.

Chetan Bodke

Karishma Kapoor: सध्या फिफा वर्ल्ड कप सर्वत्र कमालीचा चर्चेत आहे. हा फुटबॉलचा ब्लॉकबस्टर अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये लुसेल स्टेडियममध्ये पार पडला. या दोन्ही संघानी आपला जोरदार खेळ दाखवत मेस्सीच्या अर्जेंटिनाने चार पावलं पुढे टाकत फ्रान्सला धूळ चारली. हा रंगतदार फिफा वर्ल्ड कप २०२२चा अंतिम सामना जिंकत अर्जेंटिनाने मोठा इतिहास रचला. या सामन्याला बऱ्याच बॉलिवूड अभिनेत्यांनी सुद्धा हजेरी लावली होती. बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत आपला आनंद द्विगुणीत केला.

यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कतारमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. फिफा विश्वचषक फायनलपूर्वी करिश्मा कतारमध्ये तिच्या सुट्टींचा पुरेपूर आनंद घेताना दिसली. करिश्माच्या फोटोंचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. तिने आपल्या खास अंदाजातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तिने खास अंदाजातील शेअर केलेल्या फोटोंवर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. करिश्मा आजही आपल्या सौंदर्याने आजच्या बॉलिवूडमधील तरुण अभिनेत्रींना मागे सारत आपल्या सौंदर्याचा डंका वाजवत आहे. तिने कतारमधील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवत शेअर केले आहे.

करिश्माने १९९१ मध्ये हरीश कुमारसोबत 'प्रेम कैदी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. प्रेक्षकांनी करिश्माला शेवटचे 2020 मध्ये ZEE5 आणि ALTBalaji's Mentalhood मध्ये पाहिले. यात तिची संजय सुरी, संध्या मृदुल, शिल्पा शुक्ला आणि श्रुती सेठ यांच्यासोबत वेब सीरिजमध्ये दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT