Kareena Kapoor - Saif Ali Khan Saam TV
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor Trolled: सैफनं सावरलं, पण करीना झाली ट्रोल, सर्वांची लाडकी बेबो नेटकऱ्यांच्या रडारवर का आली, असं काय घडलं? VIDEO

Kareena Kapoor Video: करीना कपूर आणि सैफ अली खानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Kareena Kapoor - Saif Ali Khan:

करीना कपूर आणि सैफ अली खान बॉलिवूडमधील एक सुंदर कपल आहे. करीना आणि सैफ अनेकदा एकत्र स्पॉट होत असतात. दोघेही बऱ्याचदा त्यांच्या कुटुंबासह ट्रिप, डिनर आणि लाँचसाठी देखील जातात.

करीना कपूर आणि सैफ अली खान यांना या वीकेंडला देखील डिनरला जात एकत्र वेळ घालवला. यावेळी दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून जाताना पापाराझींच्या कॅमेरात कैद झाले.

करीना कपूर आणि सैफ अली खानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सैफ अली खान, करीना कपूरचा हात पकडून तिला रेस्टोरंटच्या बाहेर घेऊन येताना दिसत आहे. तसेच सैफने खूप काळजीपूर्वक करीनाला गाडीत देखील बसवले.

सैफ अली खानने या व्हिडीओमध्ये करीनाची घेतलेली काळजी पाहून नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत. तर काही नेटकरी करीनाला पाहून तिला ट्रोल करत आहेत. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, करीना खूप दारू प्यायली आहे. त्यामुळे सैफ तिला असं हात पकडून नेत आहे. या व्हिडीओमुळे करीना खूप ट्रोल होत आहे.

या व्हिडीओमध्ये रेस्टोरंटमधून बाहेर आल्यावर सैफने पापाराझींना हाय, हॅलो केलं. परंतु करीना मात्र काही न बोलता सैफसोबत चालत होती. तिने पापाराझींकडे पाहिले देखील नाही. करीनाच्या या वागण्यामुळे नेटकऱ्यांचे लक्ष मात्र तिच्याकडे गेले.

करीना कपूरचा नुकताच 'जाने जा' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये करीना कपूर, विजय वर्मा आणि जयदीप अहलावत आहेत. या चित्रपटातील तिघांच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. तसेच करीना लवकरच तब्बू आणि क्रिती सनन यांच्यासह 'द क्रू'मध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasmine Oil Benefits For Skin And Hair: थंडीत चेहरा अन् केसांना लावा चमेली तेल, ४-५ दिवसात दिसेल मोठा फरक

Link Road: नवी मुंबईत १४ किमीचा नवा लिंक रोड, एक्सप्रेसवे अन् JNP हाकेच्या अंतरावर येणार, वाचा सविस्तर

ZP Election Date : ४६ दिवस शिल्लक, जिल्हा परिषद निवडणुकीच्या घोषणा कधी?

Plane Crash: लँडिंगदरम्यान विमान कोसळलं, ७ जणांचा मृत्यू; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Nashik Travel : किल्ल्यांचे विहंगम दृश्य अन् आव्हानात्मक ट्रेक, नाशिकमध्ये लपलंय 'हे' सुंदर ऐतिहासिक ठिकाण

SCROLL FOR NEXT