Karate Kid Legends Collection Day 1 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Karate Kid Legends Collection: अजय देवगणच्या लेकाचा पहिला चित्रपट हाऊसफुल; पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची किती कमाई

Karate Kid Legends Collection: 'कराटे किड: लिजेंड्स' या बहुप्रतीक्षित चित्रपटाने 30 मे 2025 रोजी भारतात प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी कोट्यावधींची कमाई केली.

Shruti Vilas Kadam

Karate Kid Legends Collection: 'कराटे किड: लिजेंड्स' या बहुप्रतीक्षित चित्रपटाने 30 मे 2025 रोजी भारतात प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी 1.75 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाच्या हिंदी डबिंगमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि त्यांचा 14 वर्षीय मुलगा युग देवगण याने प्रमुख भूमिका साकारलेल्या पात्राला आवाज दिला आहे. अजय देवगणने मिस्टर हॅन (जॅकी चॅन) या पात्राला, तर युगने ली फॉंग (बेन वांग) या पात्राला आवाज दिला आहे .

चित्रपटाच्या पहिल्या दिवशी हिंदी एडिशन थिएटरमध्ये 6% उपस्थिती होती, तर इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू एडिशनमध्ये तुलनेत अधिक प्रतिसाद मिळाला. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबादसारख्या प्रमुख शहरांमध्ये चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. तर, काही थिएटरमध्ये हा चित्रपट हाऊसफुल ठरला

'कराटे किड: लिजेंड्स' ही 'कराटे किड' फ्रँचायझीचा नवा चित्रपट आहे. यात ली फॉंग नावाच्या कुंग फू प्लेअसची कथा आहे, जो न्यूयॉर्क शहरात स्थलांतरित होतो आणि मिस्टर हॅन व डॅनियल लारुसो यांच्या मार्गदर्शनाखाली 'फाईव्ह बरोस कराटे टूर्नामेंट' मध्ये सहभागी होतो .

चित्रपट सध्या थिएटरमध्ये प्रदर्शित आहे आणि लवकरच व्हिडिओ-ऑन-डिमांड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. नेटफ्लिक्स या चित्रपटाचा ओटीटी पार्टनर असल्यामुळे, चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर चार महिन्यांनी, म्हणजे सप्टेंबर 2025 च्या अखेरीस, नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राळेगाव प्रकरणातील संशयित आरोपी मजहर कुरेशीच्या घरावर जमावाकडून दगडफेक

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

SCROLL FOR NEXT