Karan Kundrra And Tejasswi Prakash Breakup Rumours Saam Tv
मनोरंजन बातम्या

Karan- Tejasswi Breakup Rumours : ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा स्पॉट, रोमँटिक अंदाजात एकत्र दिसल्यामुळे चर्चांणा उधाण

Karan Kundrra And Tejasswi Prakash News : तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा या फेमस कपलच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. अशातच हे क्यूट कपल रविवारी रात्री डिनर डेटसाठी स्पॉट झालं.

Chetan Bodke

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा हे टीव्ही इंडस्ट्रीतील फेमस कपलपैकी एक आहे. गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती. ब्रेकअपच्या चर्चांवर तेजस्वी आणि करण यांच्यापैकी कोणीही ब्रेकअपवर भाष्य केलं नव्हतं. अशातच हे कपल आता एकत्र स्पॉट झाले आहे. काल इन्स्टाग्रामवर करण कुंद्राने काही फोटो शेअर केले होते. त्यानंतर काल रात्री उशीरा तेजस्वी आणि करण एकत्र स्पॉट झाले आहेत.

करणने इन्स्टाग्रामवर रविवारी दुपारी त्याचे आणि तेजस्वीचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना त्याने गोड कॅप्शनही दिलं होतं. त्यांची ही रोमँटिक पोस्ट पाहून चाहते देखील चांगलेच खूश झाले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. त्यासोबतच काल रात्री उशिराही तेजस्वी आणि करण एकत्र स्पॉट झाले होते. ब्रेकअपच्या चर्चांनंतर फेवरेट कपल एकत्र स्पॉट झाल्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दोघेही एकत्र स्पॉट झाल्यानंतर अनेक युजर्सने लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला आहे.

यावेळी करणने कोट, पँट आणि व्हाईट शर्ट तर तेजस्वीने ब्लॅक कलरचा वेस्टर्न ड्रेस कॅरी करत दोघेही स्पॉट झाले होते. 'बिग बॉस १५'मध्ये (Bigg Boss 15) तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. यावेळी शोमध्ये तेजस्वी आणि करणची मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. बिग बॉसनंतर तेजस्वी एकता कपूरच्या'नागिन ६' मालिकेत दिसली होती, या मालिकेनेही तिला विशेष प्रसिद्धी मिळाली आहे. तर करण सध्या टीव्हीवरील काही कार्यक्रमात होस्टिंग करीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तेजस्वीचा कोणताही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. सध्या तिचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT