Ibrahim Ali Khan and karan johar Instagram
मनोरंजन बातम्या

Ibrahim ali khan: करण जोहर करणार सैफ अली खानच्या मुलाला लाँच; इब्राहिमसाठी लिहिली भलीमोठी पोस्ट

Ibrahim Ali Khan and karan johar: करण जोहर त्याच्या चित्रपटांसाठी तसेच स्टार किड्सना लाँच करण्यासाठी ओळखला जातो. करण जोहरने आतापर्यंत अनेक स्टार किड्स लाँच केले आहे.

Shruti Vilas Kadam

ibrahim ali khan: अमृता सिंग आणि सैफ अली खान यांचा मुलगा इब्राहिम अली खान गेल्या काही काळापासून चित्रपटांमधील पदार्पणामुळे चर्चेत आहे. इब्राहिम गेल्या बऱ्याच काळापासून कॅमेऱ्यामागे काम करत आहे. त्याने करण जोहरसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. हा चित्रपट इब्राहिमचा दिग्दर्शनातील पदार्पण आहे. आता सैफ अली खानचा मुलगा मोठ्या पडद्यावरही पदार्पण करताना दिसणार आहे.

करण जोहरने स्वतः आणखी एका स्टार किडला लाँच करण्याची जबाबदारी घेतली आहे. करणने सोशल मीडियावर याबद्दल एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनणाऱ्या चित्रपटात इब्राहिम अली खान दिसणार आहे. करणने स्वतः सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे आणि इब्राहिमचे फोटो पोस्ट केले आहेत.

करणने अमृतासोबतच्या पहिल्या भेटीची कहाणी सांगितली

करण जोहरने त्याच्या इंस्टा पेजवर इब्राहिमच्या काही फोटो शेअर करत लिहिले, “मी १२ वर्षांचा असताना डिंगी म्हणजेच अमृताला भेटलो. तिने माझ्या वडिलांसोबत आणि धर्मा प्रॉडक्शन्ससोबत 'दुनिया' नावाचा चित्रपट केला. डिंगीने ती भूमिका खूप सुंदरपणे साकारली होती मला ती भूमिका अजूनही चांगली आठवते. पण तिच्याबद्दलची माझी सर्वात चांगली आठवण म्हणजे आमची पहिली भेट, जेव्हा अमृता, तिची हेअरस्टायलिस्ट आणि मी एकत्र चायनीज डिनर केले आणि नंतर जेम्स बाँड चित्रपट पाहिला. त्यावेळी अमृताने मला ती आमची पहिली भेट होती हे जाणवू दिले नाही. तिची मुलेही त्याच्यासारखीच आहेत."

करण इब्राहिमला लाँच करणार आहे.

करण जोहर पुढे लिहितो, “मी पहिल्यांदाच सैफला आनंद महिंद्राच्या ऑफिसमध्ये भेटलो. तो अगदी उत्तम दिसत होता, तसेच मी इब्राहिमला पहिल्यांदा भेटलो तेव्हाच आमची घट्ट मैत्री झाली आहे. मी या कुटुंबाला गेल्या ४० वर्षांपासून ओळखतो. आम्ही वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि काही चित्रपट येत आहेत. चित्रपट त्यांच्या रक्तात, त्यांच्या अनुवांशिकतेत आणि त्यांच्या आवडीत आहेत. तर आता इब्राहिम अली खान देखील लवकरच मोठ्या पडद्यावर तुमच्या हृदयात स्थान निर्माण करण्यासाठी येत आहे. खरं तर, याआधीही करणने अनेक स्टार किड्स लाँच केले आहेत. त्यापैकी सर्वात यशस्वी म्हणजे आलिया भट्ट.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT