Kapil Sharma On Indigo Airlines Saam TV
मनोरंजन बातम्या

Kapil Sharma: 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे!', फ्लाइटला उशिर झाल्यामुळे संतापला कपिल शर्मा, IndiGo एअरलाइन्सची घेतली शाळा

Priya More

The Kapil Sharma Show:

'द कपिल शर्मा शो'च्या (The Kapil Sharma Show) माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) सध्या चर्चेत आला आहे. यामागचे कारण म्हणजे कपिल शर्माने इंडिगो एअरलाइन कंपनीची (Indigo Airlines Company) चांगलीच शाळा घेतली आहे.

बुधवारी रात्री फ्लाइटला उशिर झाल्यामुळे कपिल शर्माचा राग अनावर झाला आणि त्याने सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत एअरलाइन्स कंपनीवर संताप व्यक्त केला आहे. कपिल शर्माची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कपिल शर्माने सोशल मीडियावर पोस्ट करत देशातील सर्वात मोठ्या एअरलाइनवरलटीका केली आणि प्रवाशांशी खोटे बोलत असल्याचा आरोप केला. कपिलने इंडिगो एअरलाइनवर प्रवाशांना ट्रांजिट बसमध्ये सुमारे तासभर थांबायला लावल्याचा आरोप केला आहे. तसंच, एअरलाइन्सकडून फ्लाइटसंदर्भात काहीच अपडेट देण्यात आले नसल्याचे देखील त्याने सांगितले. कंपिलने सांगितले की, त्यांना फक्त हेच सांगितले होते की, 'पायलट ट्राफिकमध्ये अडकला आहे' ऐवढंच नाही तर कपिल शर्माने इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलण्याची मागणी करणाऱ्या प्रवाशांचा एअरलाइन ग्राउंड स्टाफसोबत वाद झाल्याचा व्हिडिओही शेअर केला आहे.

कपिल शर्माने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'डिअर इंडिगो, आधी तुम्ही आम्हाला बसमध्ये 50 मिनिटे थांबायला लावले आणि आता तुमची टीम म्हणतेय की पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला आहे, हे खरंच आहे का? आम्हाला रात्री 8 पर्यंत टेक ऑफ करायचा आहे. 9:20 झाले आहेत. अजूनही कॉकपिटमध्ये कोणी पायलट नाही, तुम्हाला वाटते का हे 180 प्रवासी इंडिगोमध्ये पुन्हा टेक ऑफ करतील? कधीच नाही.’

यानंतर, कपिलने विमानातून उतरतानाचे फोटो असलेले आणखी एक अपडेट शेअर केले आणि म्हणाला, 'आता ते सर्व प्रवाशांना विमानातून उतरवत आहेत आणि सांगत आहेत की आम्ही तुम्हाला दुसऱ्या विमानात पाठवू. पण आता आम्हाला सुरक्षा तपासणीसाठी पुन्हा टर्मिनलवर जावे लागणार आहे.' कपिल शर्माने या पोस्टमध्ये पुढे इंडिगो एअरलाइन्सच्या या ढिसाळ काराभाराविरोधात राग व्यक्त केला आहे.

त्याने पुढे असे सांगितले की, 'इंडिगोचे कर्मचारी खोटे बोलत आहेत, व्हील चेअरवर काही वृद्ध प्रवासी आहेत, त्यांची प्रकृती फारशी चांगली नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे!' कपिल शर्माने आपल्या ट्विटमध्ये एअरलाइनच्या अधिकृत हँडलला टॅग केले आणि त्याचा फ्लाइट क्रमांक 6E 5149 असा उल्लेख केला. हे फ्लाइट चेन्नईवरून मुंबईला येणार होते. हे फ्लाइट चेन्नईतून 8 वाजता टेकऑफ करणार होते आणि मुंबईत 9.55 ला पोहचणार होते. पण या फ्लाइटला ४ तास उशिर झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

Mithila Palkar: वेब क्विन करतेय इटलीत भटकंती; पाहा फोटो

SCROLL FOR NEXT