The Kapil Sharma Show will goes off air  Instagram @krushna30
मनोरंजन बातम्या

Kapil Sharma - Archana Puran Singh Seasons Last Photoshoot : 'द कपिल शर्मा शो' लवकरच घेणार निरोप; या दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग

The Kapil Sharma Show Goes Off Air : कपिल शर्माने आपल्या प्रेक्षकांना शोचा सीझन संपणार असल्याचे कळवले आहे.

Pooja Dange

Kapil Sharma Share Last Post With Archana Puran Singh : 'द कपिल शर्मा शो' हा टीव्ही जगतातील प्रसिद्ध शो आहे. गेली अनेक वर्ष हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचा लाडका शो लवकरच निरोप घेणार आहे. या शोचा होस्ट कपिल शर्मा आणि मार्गदर्शक अर्चना पुरण सिंग यांनी याविषयी घोषणा केली आहे. या दोघांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत शो बंद होत असल्याचे सांगितले आहे.

कपिल शर्मा आणि अर्चना पुरण सिंग सोशल मीडियावर सक्रिय असतात. नेहमीच नवीनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकताच या दोघांनी एकत्र फोटोशूट केले आहे. हे फोटो शेअर करत या दोघांनी शो बंद होणार असल्याचे जाहीर केले आहे.

या फोटोत कपिलने पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट घातला असून त्यावर नारंगी रंगाचे फ्लोरल जॅकेट आणि निळ्या रंगाची जीन्स असा स्टायलिस्ट लूक केला आहे. अर्चना पुरण सिंगने तपकीरी आणि हिरव्या रंगाचा सुट घातला आहे. (Latest Entertainment News)

दोघेही स्टायलिस्ट दिसत आहेत. तर या फोटोंना कॅप्शन देत कपिल शर्माने लिहिले आहे, "या सीझनचं शेवटचं फोटोशूट अर्चना मॅमसोबत. आम्ही तुम्हाला युएसएमध्ये मिस करु. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे." अशी पोस्ट करत या सीझनच शेवटचं शूट करत असल्याची माहिती कपिलने दिली आहे.

कपिल शर्माने आपल्या प्रेक्षकांना शोचा सीझन संपणार असल्याचे कळवले आहे. द कपिल शर्मा शोमध्ये कपिल शर्मा आणि अर्चना पुरण सिंग हे दोघेही एकमेकांना बोलायची एकही संधी सोडत नाही. दोघेही एकमेकांवर नेहमीच जोक्स करत असतात.

नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार द कपिल शर्माचा शेवटचा एपिसोड 'गदर-२' च्या टीमसोबत शूट होणार आहे. या एपिसोडमध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल हजेरी लावणार असल्याची माहिती समोर येत आहे. याचं प्रक्षेपण २ जुलै किंवा ९ जुलैला होणार आहे.

कपिल शर्मा या शोच्या जागी आता 'इंडियास् गॉट टॅलेंट' हा कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे. या शोमध्ये शिल्पा शेट्टी, किरण खेर, बादशाह प्रशिक्षक म्हणून असणार आहेत.

'द कपिल शर्मा शो'ची संपूर्ण टीम एका महिन्यासाठी युएसएला जाणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी स्वतः कपिलने सोशल मीडियावरून दिली होती. कपिल शर्मा आता युअसएमध्ये आपला शो करणार आहे.

युएसएमध्ये पहिला शो ८ जूलैला होणार आहे. सर्व शोच्या वेळापत्रकाची माहिती कपिलने सोशल मीडियावरून दिली आहे. याआधीही अनेकदा शो बंद झाला असून पुन्हा नवीन सीझनसोबत कपिल या शोच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या सीझननंतर कपिल शर्मा शो पुन्हा कधी येणार यासाठी प्रेक्षक आतूर झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

SCROLL FOR NEXT