Kapil Sharma Cafe Firing Case Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kapil Sharma Cafe Firing Case: कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करणारा 'रॉकेट' फ्रान्समध्ये अटक; लॉरेन्स बिश्नोई गँगला मोठा धक्का

Kapil Sharma Cafe Firing Case: कपिल शर्माच्या कॅफेवरील गोळीबारातील आरोपी गरिंदर देव उर्फ 'रॉकेट' फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगविरोधात अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय देशांची संयुक्त कारवाई सुरू आहे.

Shruti Vilas Kadam

Kapil Sharma Cafe Firing Case: कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीविरोधातील आंतरराष्ट्रीय कारवाईला मोठे यश मिळाले आहे. कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि बिश्नोई टोळीचा सदस्य गरिंदर देव उर्फ 'रॉकेट' याला फ्रान्समध्ये अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेनंतर कॅनडाने त्याच्या हंस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या कारवाईमुळे बिश्नोई टोळीला मोठा धक्का बसला आहे.

कॅनडाच्या रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (RCMP) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय गरिंदर देव हा 'रिट्झ कार्लटन', 'रॉकेट' आणि 'डॉक्टर' या टोपणनावांनी ओळखला जात होता. अमेरिकेच्या न्याय विभागाने (DoJ) दाखल केलेल्या आरोपपत्रातही त्याचे नाव समाविष्ट आहे. बिश्नोई टोळीला पैसे मिळावे म्हणून तो अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचा आरोप आहे.

तपासानुसार, गरिंदर देवने १०० किलो कोकेन आणि एक किलो हेरॉइन अमेरिकेतील कॅलिफोर्निया तसेच पूर्व किनारपट्टीवर पोहोचवण्याचा कट रचला होता. मात्र, अमेरिकन तपास यंत्रणांनी हा मोठा अमली पदार्थांचा साठा आधीच जप्त केला. त्यामुळे त्याच्याविरोधातील पुरावे अधिक मजबूत झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, कपिल शर्माच्या कॅफेवरील गोळीबार प्रकरणातील आणखी एक आरोपी जशनदीप सिंग यालाही कॅनडातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोळीबारात वापरलेले शस्त्र लपवून ठेवण्यासाठी त्याने मदत केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. जशनदीप २०२२ मध्ये विद्यार्थी व्हिसावर कॅनडात गेला होता.

अमेरिकेच्या तपासातून लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कामाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ही टोळी डीसेंट्रलाइज मॉडलने काम करत असून, तिचे सदस्य विविध देशांमध्ये राहून गुन्हे करतात. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमधील तरुणांची शूटर म्हणून भरती केली जाते. सुरुवातीला त्यांना लहानमोठी कामे दिली जातात. त्यानंतर पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर बनावट कागदपत्रे किंवा 'डंकी रूट'च्या माध्यमातून त्यांना अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांमध्ये पाठवले जाते.

अमेरिकेच्या न्याय विभागाने लॉरेन्स बिश्नोई टोळीसह आणखी दोन भारतीय गुन्हेगारी संघटनांविरोधातही आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात एकूण ३६ जणांची नावे नमूद करण्यात आली असून, त्यापैकी २५ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित ११ आरोपींचा शोध सुरू असून, आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांनी बिश्नोई टोळीविरोधातील कारवाई अधिक कडक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन; देशाच्या राजकारणात शोककळा

Maharashtra News Live Update: येरवडा गणेश नगर परिसरात दोन गटांतील मुलींमध्ये जोरदार हाणामारी

Breast Cancer Drug: ब्रेस्ट कॅन्सरच्या रूग्णाचा मृत्यू! महागड्या कॅन्सरच्या औषधासाठी तीन वर्षांत ५७ वेळा सुनावणी पुढे, आता थेट सरन्यायाधीशांना पत्र

Bhaji Recipes : झटपट भाजी बनवायचीये? 10 मिनिटांत तयार होणाऱ्या या रेसिपी पाहाच

Ketan Agrawal : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! 'या' कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता?

SCROLL FOR NEXT