Kantara Part 2  x
मनोरंजन बातम्या

Kantara 2 : अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चित्रपटाच्या सेटवर दोन महिन्यात तिसरा मृत्यू; सिनेसृष्टीत खळबळ

Kantara Part 2 चित्रपटाच्या सेटवरुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. चित्रपटामधील अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मागील दोन महिन्यातला चित्रपटाच्या युनिटमधील हा तिसरा मृत्यू आहे.

Yash Shirke

Kantara 2 च्या टीमला मोठा धक्का बसला आहे. कांतारा पार्ट २ या चित्रपटातील अभिनेता कलाभवन निजू यांचे निधन झाले आहे. ते ४३ वर्षांचे होते. शूटिंगदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. चित्रपटाच्या सेटवर हृदयविकाराच्या झटक्याने कलाभवन निजू यांचे निधन झाले. त्यांनी मृत्यूपूर्वी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. कांतारा या कन्नड चित्रपटाच्या युनिटमधील हा तिसरा मृत्यू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शूटिंगदरम्यान छातीत दुखू लागल्याने कलाभवन निजू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. मिमिक्रा आर्टिस्ट कानन सागर यांनी त्यांच्या मृत्यूबाबतची माहिती दिली. कलाभवन निजू हे सक्षम अभिनेता आणि मिमिक्री आर्टिस्ट होते. ऑडिशनमध्ये कमाल करत त्यांनी कांतारा चित्रपटामध्ये मोठी भूमिका मिळवली होती. ते मार्को या सुपरहिट चित्रपटात दिसले होते.

कांताराच्या युनिटमधील दोन सदस्यांचा याआधी मृत्यू झाला. मे २०२५ मध्ये अभिनेते राकेश पुजारी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. ते फक्त ३३ वर्षांचे होते. राकेश त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी गेले होते, त्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जीव गेला. त्याच महिन्यात, काही दिवसांनी ३२ वर्षीय ज्युनियर आर्टिस्ट एमएफ कपिल यांचेही निधन झाले होते.

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित, लिखित आणि अभिनीत कांतारा पार्ट १ हा कन्नड चित्रपट खूप गाजला होता. २०२२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हा कांताराने ३६० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. आता याचा पार्ट २ येणार आहे. याच चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरु आहे. कांतारा पार्ट २ चित्रपट २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह! दारुच्या नशेत कारचालकाने डिलिव्हरी बॉयला उडवले, छातीवरून चाक गेले अन्...

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Anurag Dwivedi Case: लॅम्बोर्गिनी ते थार...; युट्यूबरच्या घरी ईडीचा छापा, दुबईतील क्रूझवर लग्न केल्याने संशय वाढला

Green Chutney Potato Slices : हिरव्या चटणीचे झणझणीत आणि कुरकुरीत बटाट्याचे काप, एकदा करुनच बघा

New Year 2026 Horoscope: २०२६ हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल? वाचा संपूर्ण १२ राशींचं भविष्य

SCROLL FOR NEXT