Kanguva Fire Song Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kanguva 1st Song Out : असली फायर पुष्पा नाही 'कंगुवा', सुर्याने चाहत्यांना दिलं बर्थडे गिफ्ट; 'फायर' गाणं रिलीज

Kanguva Fire Song Out : टॉलिवूड अभिनेता सूर्याचा आज ४९ वा वाढदिवस आहे. अभिनेत्याने आपल्या वाढदिवशी चाहत्यांना बर्थडे गिफ्ट दिलं आहे.

Chetan Bodke

टॉलिवूड अभिनेता सूर्याचा आज ४९ वा वाढदिवस आहे. अभिनेत्याने आपल्या वाढदिवशी चाहत्यांना बर्थडे गिफ्ट दिलं आहे. अभिनेता सुर्याचा लवकरच 'कंगुवा' चित्रपट रिलीज होत आहे. येत्या १० ऑक्टोबरला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या ॲक्शन थ्रिलर चित्रपटातलं पहिलं वहिलं ‘फायर’ साँग रिलीज झालं आहे. हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गाण्याला प्रेक्षकांकडून दमदार मिळत असून सूर्याच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. 'फायर' हे गाणं देवी श्री प्रसाद उर्फ डीएसपी आणि बी प्राकने बनवलं आहे. सध्या हे गाणं म्युझिकमुळे सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. नेटकऱ्यांनी गाण्याचे जोरदार कौतुक केले असून गाण्याला काही तासातच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. बी प्राकने गाणं गायलं असून डीएसपीने म्युझिक दिलं आहे. तर, रकीब आलमने गाणं लिहिलं आहे. गाण्यात सूर्याने केलेल्या ॲक्शनची जोरदार चर्चा होत आहे.

'कांगुवा' चित्रपटाचा २०२४ मधील बहुप्रतिक्षित आणि बिगबजेट चित्रपटांच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे. हा चित्रपट येत्या १० ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होणार असून गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. सुर्यासोबत चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत बॉबी देओल आणि दिशा पटानी दिसणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार ह्या चित्रपटात अनेक तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं बजेट ३५० कोटी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News : मान्सून गोव्यात दाखल; महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान खात्याचा ताजा अंदाज आला समोर

Pune Crime: पुण्यात रक्तरंजित थरार! विद्यार्थ्याकडून वर्गमित्राची हत्या, झोपेत असताना चाकूने सपासप वार करत संपवलं

एकही पिंपल दिसणार नाही! चमकदार त्वचेसाठी आजच बदला 'या' ५ वाईट सवयी

Lifestyle habits: महिलांनो...तुम्हाला या ५ सवयी असतील तर अकाली दिसू शकता वृद्ध!

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत

SCROLL FOR NEXT