Emergency first look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Emergency first look: इंदिरा गांधी बनली कंगना रनौत, फर्स्ट लूक पाहा

बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत मधल्या काळात तिच्या 'इमर्जन्सी' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होती. या चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि टीझर समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत(Kangana Ranaut) मधल्या काळात तिच्या 'इमर्जन्सी' (Emergency) या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होती. या चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि टीझर समोर आला असून, या चित्रपटामध्ये कंगना देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग अजूनही सुरू आहे. मात्र या चित्रपटाच्या पहिल्या टीझरमुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटात अभिनयासोबतच कंगना पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणूनही काम करणार आहे.

टीझरची सुरुवात एका मोठ्या ऑफिसपासून होते, ज्यामध्ये एक माणूस फोन उचलून थोडा वेळ फोनवर बोलतो. फोन ठेवल्यानंतर हा माणूस दुसऱ्या खोलीत जातो, जिथे एक महिला उभी असलेली दिसते. तो माणूस विचारतो की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तुम्हाला 'मॅडम' म्हणू शकतात का? असे त्यांनी फोन करून विचारले आहे. यानंतर कंगना रनौतची एक झलक दिसते. या लूकमध्ये ती हुबेहूब माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासारखी दिसत आहे.

कंगनाचा चेहरा एका बाजूने दिसतो, पण तिला पाहून कोणीही म्हणू शकत नाही की ती कंगना रनौत आहे. तिला पाहून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीच आठवण येते. कंगना यानंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्टाईलमध्ये म्हणते, 'अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगा की, मला माझ्या ऑफिसमध्ये सगळे सर म्हणतात'.

'इमर्जन्सी' हा कंगना रनौतच्या प्रॉडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्सचा पहिला चित्रपट आहे. कंगनाचा शेवटचा चित्रपट 'धाकड' चे लेखक रितेश शाह यांनी 'इमर्जन्सी' या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. कंगना गेल्या काही काळापासून या चित्रपटावर काम करत आहे. तिने प्रसिद्ध प्रोस्थेटिक मेक-अप आर्टिस्ट डेव्हिड मालिनॉस्की या चित्रपटासाठी काम करणार असल्याचे सांगितले होते. डेव्हिडने त्याच्या मेकअपआर्टसाठी ऑस्करसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT