Kangana Ranaut Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: 'अभिनेत्रीला त्रास होत असेल तर...'; 'पेड्डी'तील जान्हवी कपूरच्या बोल्ड सीन्सवर कंगनाचे मोठे वक्तव्य

Kangana Ranaut: ‘पेड्डी’ चित्रपटातील जान्हवी कपूरच्या भूमिकेवरून सुरू झालेल्या वादावर कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रींच्या शूटिंगबाबत तिने महत्तवाचे मुद्दे मांडले आहेत.

Shruti Vilas Kadam

Kangana Ranaut: साऊथ सुपरस्टार राम चरण आणि बॉलिवूडची अभिनेत्री जान्हवी कपूर अभिनीत ‘पेड्डी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तरीही हा चित्रपट एका नव्या वादामुळेही चर्चेत आला आहे. चित्रपटातील जान्हवी कपूरच्या व्यक्तिरेखेचे चित्रण आणि तिचे काही शोट्समुळे तिला ऑब्जेक्टिफिकेशन केल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला आहे. या वादावर आता अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘पेड्डी’ प्रदर्शित झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी जान्हवीच्या पात्राबाबत नाराजी व्यक्त केली. काही दृश्यांमध्ये तिच्या व्यक्तिरेखेपेक्षा तिच्या शारीरिक सौंदर्यावर अधिक भर दिल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यानी मोठी नाराजी व्यक्त केली. या सुरु असल्याल्या वादाबाबत एका मुलाखतीत कंगना रणौत यांना विचारले असता त्या म्हणाल्या, चित्रपट निर्माते मुद्दाम एखाद्या अभिनेत्रीला केवळ एक 'वस्तू' म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत नाहीत. मात्र, पुरुषांच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या पटकथांमध्ये कधीकधी असे काही प्रसंग असतात ज्यामुळे स्त्रियांना चुकीचं वाटू शकत. अशावेळी एक अभनेत्री म्हणून, तुम्ही तुमचे म्हणणे मांडले पाहिजे. जर एखादा सीन किंवा त्याची सुरुवात तुम्हाला योग्य वाटत नसेल, तर तुम्ही त्याबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे. बहुतेक वेळा, लोक तुमचा दृष्टिकोन समजून घेतात आणि त्यात बदल करण्यास तयार होतात.".

या चित्रपटाभोवती वाढत्या टीकेनंतर ‘पेड्डी’चे दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनीही प्रतिक्रिया देत प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन काही बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. महिलांचा सन्मान राखणे महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी वादग्रस्त वाटणाऱ्या बाबींचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान लवकरच कंगना रणौत यांचा 'भारत भाग्य विधाता' हा चित्रपट लवकरत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २६/११ च्या हल्यावेळी कामा हॉस्पिटलमधील धडसी निर्भिड नर्सवर आधारित आहे. यावेळी त्यांनी केलेले कार्य उत्तम प्रकारे मांडण्यात आले आहे. कंगना यांच्यासह या चित्रपटात गिरिजा ओक गोडबोले, स्मिता तांबे, ईशा डे, प्रसाद ओक, आशा शेलार असे मराठी कलाकार देखील आहेत. हा चित्रपट १२ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'शाळांची स्थिती सुधारा, सुविधा द्या! CJP च्या पोलखोलनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री भुसेंची क्लास

कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर, राजकारणात खळबळ

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा होणार कायापालट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आखला रोडमॅप

काँग्रेसला जोरदार धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

CJPचं 'स्कूल ठीक करो' अभियान वादात, लातूरमध्ये दिपकेंसह 5 जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT