Kangana Ranaut Reached Kedarnath Temple Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Visits Kedarnath: कपाळी गंध, गळ्यात रूद्राक्षाची माळ; कंगनाने घेतले केदारनाथ मंदिरात दर्शन...

Kangana Ranaut At Kedarnath Temple: आज कंगना रनौतसोबत महामंडलेश्वर स्वामी १००८ कैलाशानंद महाराज यांनीही केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

Chetan Bodke

Kangana Ranaut Reached Kedarnath Temple: बॉलिवूडची फायर ब्रँड अभिनेत्री कंगना रनौतने आज केदारनाथचे दर्शन घेतले. महामंडलेश्वर स्वामी १००८ कैलाशानंद महाराज यांनीही कंगनासोबत यावेळी केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

सध्या अनेक भाविक केदारनाथचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत. अशातच सेलिब्रिटीही केदारनाथ बाबांचं दर्शन घेत आहे. काल बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार देखील मंदिरात दर्शनासाठी गेला होता. तर आज अभिनेत्री कंगना रनौतनेदेखील केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

मंदिरात दर्शनासाठी गेल्या नंतर कंगनाने माध्यमांसोबत संवाद साधला, कंगना म्हणाली, केदारनाथच्या दर्शनाने सनातन धर्मावरील श्रद्धा अधिक वाढली आहे. मी सनातन धर्माचा प्रचार करणार असल्याचे ही तिने यावेळी सांगितले.

कंगनाने सामान्य यात्रेकरूंसोबत तिनेही दर्शन घेतल्यानंतर त्यांच्यासोबत काही वेळ संवाद देखील साधला. बीकेटीसीचे मीडिया प्रभारी डॉ. हरीश गौर यांनी सांगितले की, अभिनेत्री कंगना रनौतने केदारनाथ यात्रा व्यवस्थेबद्दल मंदिर समिती आणि प्रशासनाचे कौतुक केले. यावेळी बीकेटीसीचे सीईओ / केदारनाथ उत्थान चॅरिटेबल ट्रस्टचे संयुक्त सचिव योगेंद्र सिंह यांनी कंगना राणौतचे स्वागत करत प्रसाद, कपाळावर गंध, रुद्राक्ष माळ भेट म्हणून दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garuda Purana: मृत्यूनंतर आत्म्याला नवीन शरीर किती दिवसांनी मिळतं? गरुड पुराणात दिलीये माहिती

Bipasha Basu: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; तुकाराम मुंडेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

Weight Loss Drink: लिंबू पाणी की कोमट पाणी; वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

Maharashtra News Live Update: भंडारा भीषण अपघातात आणखी एका महिलेचा मृत्यू, मृतकाचा आकडा पोहोचला ९ वर

राजकारणात मोठा भूकंप! भाजपने सोडली बंडखोर खासदारांची साथ; स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT