Kangana Ranaut Emergency Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangna Ranaut: कंगना राणौत यांच्या Emergency ची रिलीज डेट लटकली, साऊथच्या 'या' दोन चित्रपटांना लागली लॉटरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत त्यांच्या चित्रपटांमुळे आणि राजकारणातील वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कंगना यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेल्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची घोषणा वर्षाच्या सुरुवातीला करण्यात आली होती.काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर ट्रेलर प्रचंड व्हायरल झाला. सर्वत्र चित्रपटाबद्दल चर्चा सुरू झाली. प्रेक्षकांकडून चित्रपटाला भरपूर प्रतिसाद मिळताना दिसतोय. 'इमर्जन्सी' चित्रपचामध्ये अनेक दिग्गज कलाकार कंगना यांच्यासोबत चित्रपटामध्ये दिसणार आहे.

'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिनेता मिलिंद सोमण चित्रपटामध्ये 'सॅम माणेकशॉ' यांची भूमिका साकारणार आहे. त्यासोबतच कंगना चित्रपटामध्ये दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकल्याची माहिती समोर आली होती.

'इमर्जन्सी' प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र 'इमर्जन्सी' चित्रपटगृहांमध्ये कधी प्रदर्शित होणार याबद्दल कोणती माहिती अद्यापही मिळाली नाही. 'इमर्जन्सी' चित्रपटाची तारिख पुढे ढकल्यामुळे साऊथच्या २ चित्रपटांना मोठा फायदा होणार आहे. साऊथ सुपरस्टार विजय थालापथीचा 'गोट' हा अॅक्शन चित्रपट ५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन व्यंकट प्रभू यांनी केले आहे. चित्रपटामध्ये विजयची दुहेरी भूमिका पाहायला मिळणार आहे. तमिळ आणि तेलुगूसोबतच हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित होणार आहे.

त्यानंतर साउथ अभिनेता विक्रमचा ‘तंगलान’हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ५ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलल्यामुळे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतील अशी शक्यता आहे. कंगना यांच्या 'इमर्जन्सी' चित्रपटामध्ये महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, अनुपम खेर, मिलिंद सोमन यांच्या सारखे कलाकार पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये प्रेक्षकांबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Edited By: Nirmiti Rasal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Kirtan: 'स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करू नका, गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका', इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना फटकारले

Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT