Kangana Ranaut In Salman Khan Bigg Boss 17 Show Instagram
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Flirt With Salman Khan: ‘तेजस’च्या प्रमोशनसाठी पंगा गर्ल 'बिग बॉस'च्या घरात, होस्ट कंगनाला पाहून सर्वच झाले अचंबित...

Bigg Boss 17 Latest News: ‘बिग बॉस १७’च्या रविवारच्या स्पेशल एपिसोडमध्ये कंगनाने तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली आहे.

Chetan Bodke

Kangana Ranaut In Salman Khan Bigg Boss 17 Show

'बिग बॉस १७' सुरू होऊन आठवडा झाला आहे. या शनिवार- रविवारी सलमानचा पहिला 'वीकेंड का वार' पार पडणार आहे. यावेळी सलमान खानला पाहण्यासाठी, तो कोणाची कानउघडणी करणार?, कोणाला कानमंत्र देणार? हे जाणून घेण्यासाठी फक्त स्पर्धकच नाही तर प्रेक्षकही उत्सुक आहेत.

त्यासोबतच सलमानच्या या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी प्रमोशनसाठी हजेरी लावत असतात. येत्या रविवारी कंगना रणौत आपल्या आगामी ‘तेजस’ चित्रपटाकरिता शोमध्ये हजेरी लावणार आहे.

शनिवारी ‘टायगर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टायगर श्रॉफ आणि क्रिती सेननने 'बिग बॉस १७'च्या घरामध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यामध्ये काही प्रमाणात वादाचे खटकेही उडाले. येत्या रविवारच्या स्पेशल एपिसोडमध्ये कंगना हजेरी लावणार आहे. यावेळी तिने सलमानची नक्कल करीत एन्ट्री मारली आहे. तिचीही स्पेशल एन्ट्री पाहून तुम्हालाही काही वेळासाठी धक्का बसेल. दरम्यान, शोचं होस्टिंग कंगना करत नसून सलमानच करणार आहे.

नुकतंच कलर्स टिव्हीच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये, कंगना स्टेजवर येते. आल्यानंतर तिने सलमानच्या खास स्टाईलमध्ये प्रेक्षकांचे स्वागत केले. तितक्यात तिच्या मागून सलमान येतो.

अचानक ती मागे पाहते, त्यावेळी तिच्यामागे सलमान उभा असतो. सलमानला पाहिल्यानंतर तिचे हावभाव पाहण्यासारखे आहे. सलमान खान स्टेजवर आल्यानंतर म्हणतो, जर तुला कोणत्या मुलाने प्रपोज केला तर, त्याला तू उत्तर कसं देशील?

“छेडोगे तो छोडेगे नहीं, जर तुझ्यासारख्या कोणत्या हँडसम, हंक मुलाने मला प्रपोज केलातर...” कंगनाचं हे उत्तर ऐकून सलमान लोटपोट हसतो. दोघेही एकमेकांना फ्लर्ट करतात, कंगना सलमानची फ्लर्टिंग स्टाईल पाहून इम्प्रेस होते

कंगना आणि सलमानने ऑनस्क्रिन केलेल्या गरब्याचीही सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. यावेळी प्रमोशन दरम्यान कंगनाने जांभळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर वन-पीस ड्रेस परिधान केला होता. यासोबतच तिच्या हटक्या हेयर स्टाइलने सर्वांचेच लक्ष वेधले. कंगना रनौतचा 'तेजस' चित्रपट २७ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. सध्या अभिनेत्री प्रमोशनमध्ये बरीच व्यग्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT