Javed Akhtar and Kangana Ranaut Controversy  Saam TV
मनोरंजन बातम्या

Javed Akhtar-Kangana Ranaut : जावेद अख्तर यांच्या अडचणी वाढणार? कंगनाने गंभीर आरोप करत घेतली कोर्टात धाव

Javed Akhtar In Trouble : कंगना रनौतने जावेद अख्तरविरोधात कोर्टात अपील केले आहे.

Pooja Dange

Kangana Ranaut Appeal Against Javed Akhtar : बॉलिवूड क्वीन कंगना रनौत तिच्या आगामी 'चंद्रमुखी 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे तिचा आणि जावेद अख्तर यांचातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत.

आता पुन्हा एकदा कंगना रनौतने जावेद अख्तरविरोधात कोर्टात अपील केले आहे. कंगना रनौतने दावा केला आहे की जावेद अख्तर मुद्दाम कोर्टात हजर राहत नाहीत. कंगनाने त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंटची मागणी केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईच्या अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात गीतकार जावेद अख्तर यांच्याविरुद्ध 'धमकी' प्रकरणात जामीनपात्र वॉरंट काढण्यासाठी याचिका दाखल केली आहे. रिपोर्ट्सनुसार, कंगनाने कथितपणे जावेद अखातर 'इच्छुकपणे' कोर्टात हजर राहण्यास अपयशी ठरल्याने आणि सुनावणीकडे दुर्लक्ष केल्याने वॉरंटची मागणी केली आहे.

जावेद अख्तर यांना ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. तथापि, त्यांचे वकील जय भारद्वाज यांनी त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला मेडिकल एमेरजन्सी असल्याने न्यायालयात हजर राहता एमरा नसल्याचे सांगितले.

कंगना रनौतचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी याला विरोध केला. गीतकारावर जामीनपात्र वॉरंट काढण्याची विनंती केली. रिपोर्ट्सनुसार, रिजवान यांनी दावा केला आहे की जावेद अख्तर मुद्दाम कोर्टात हजर झाले नाहीतराहिले , त्यामुळे न्यायाच्या हितासाठी वॉरंट जारी केले जावे.

मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने याचिकेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्या बदल्यात, जावेद अख्तर यांना पुढील सुनावणीसाठी जामीन प्रक्रियेचे पालन करण्याची संधी मिळाली.

अभिनेत्री कंगना रनौतने दाखल केलेल्या खटल्यात न्यायदंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या समन्सविरोधात जावेद अख्तर यांनी शुक्रवारी मुंबईतील सत्र न्यायालयात धाव घेतली होती. हा आदेश घाईघाईने आणि अयोग्य पद्धतीने करण्यात आल्याने न्यायालयाची दिशाभूल केल्याचा दावा त्यांनी केला. याप्रकरणी ८ ऑगस्ट म्हणजे आज सुनावणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Budget 2026: शेतकरी- लाडकी बहीण, रस्ते अन् मेट्रो, अर्थसंकल्पात काय- काय घोषणा? वाचा सर्वकाही एका क्लिकवर...

Maharashtra Budget 2026 Live Updates : मोटर वाहन करता ३० टक्के सूट - फडणवीस

Maharashtra Budget : अर्थसंकल्पात मुंबई - पुण्याला काय मिळालं? मेट्रो, रस्त्यांबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

अर्थसंकल्पात विकासाचा रोडमॅप; ज्योतिर्लिंग, बुलेट ट्रेनसह देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

Obesity in india: लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करू नका; वाढतं वजन ठरू शकतं अनेक आजारांचं कारण

SCROLL FOR NEXT